Sameer Wankhede | आपल्या मुलाविरुद्ध NCB'ने खोटी केस तयार केली | CCTV तपासा | माजी पोलीस अधिकाऱ्याचे आरोप

मुंबई, 23 नोव्हेंबर | आर्यन खान प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर NCB च्या मुंबई युनिटचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला. वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणासह ५ केसचे चौकशीचे अधिकार काढून घेण्यात आले. यानंतरही वानखेडेंच्या अडचणी कमी होताना (Sameer Wankhede) दिसत नाहीत.
Sameer Wankhede. The accused, identified as Shreyas Anant Kenjle, is the son of retired ACP Kenjle. Shreyas was arrested by the NCB on June 22, 2021 at 8 pm under the NDPS Act :
आणखी एका आरोपाने कोर्टाचं दार ठोठावलं असून या वर्षात जुन महिन्यामध्ये झालेल्या एका छापेमारीत आरोपीला अटक केल्यानंतर समीर वानखेडेंनी पंचनामा केलाच नसल्याचं आरोपीचं म्हणणं आहे. श्रेयस अनंत केंजळे असं या आरोपीचं नाव असून तो निवृत्ती पोलीस कर्मचारी ACP केंजळे यांचा मुलगा आहे. श्रेयसला २२ जुन २०२१ रोजी NCB ने रात्री ८ वाजता NDPS Act अंतर्गत अटक केली होती.
श्रेयस केंजळेने आपल्या अर्जामध्ये आपल्या घरातलं CCTV फुटेज तपासलं जावं अशी मागणी केली आहे. ज्या सोसायटीमध्ये श्रेयस राहतो त्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. श्रेयसच्या वडील आणि बहिणीने २१ जूनला ज्यावेळी श्रेयसला NCB चे अधिकारी घेऊन गेले त्यादिवसाचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टासमोर आणलं आहे. आपल्या मुलाविरुद्ध NCB ने तयार केलेली केस ही खोटी असल्याचंही निवृत्ती पोलीस कर्मचाऱ्याने अर्जात म्हटलं आहे.
२१ जूनला समीर वानखेडे हे छापेमारीच्या वेळी ठिकाणावर हजर होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसतही आहेत. परंतू त्यांचा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आलेला नाहीये. त्या दिवशी रात्री १० वाजून ५० मिनीटांनी समीर वानखेडे छापा मारल्याच्या ठिकाणावरुन परत गेले होते ही बाब सीसीटीव्हीत दिसत असल्याचं केंजळे यांचं म्हणणं आहे. समीर वानखेडेंचा उल्लेख पंचनाम्यात का नाही याचं कारणही NCB ने दिलेलं नाही असं केंजळे यांनी सांगितलं.
केंजळेंनी या प्रकरणात NCB कडे पंचनामा मागितला. परंतू वारंवार विनंती करुनही NCB केंजळेंना पंचनामा दिला नाही. अखेरीस केंजळेंनी NCB ला ई-मेल लिहील्यानंतर एका अनोळखी व्यक्तीचा त्यांना फोन आला, ज्यात त्या व्यक्तीने एनसीबीला मेल करणं थांबवा नाहीतर तुमच्या मुलाला मोठ्या प्रकरणात अडकवलं जाईल अशी धमकीही दिली. याआधीही झैद राणा या आरोपीने समीर वानखेडेंविरुद्ध अशाच पद्धतीचे आरोप केले होते. दरम्यान या आरोपांवर NCB आपला रिप्लाय या आठवड्याअखेरीस कोर्टासमोर मांडणार आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Sameer Wankhede in danger after allegations in Shreyas Anant Kenjle case.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी