2 May 2024 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

२० लाख अपात्र शेतकऱ्यांना १,३६४ कोटीचं वाटप | RTI अंतर्गत माहिती उघड

PM Kisan Scheme, RTI

मुंबई, ११ जानेवारी: पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना १,३६४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे.

अपात्र लाभार्थ्यांपैकी ५५.५८ टक्के लोक हे प्राप्तिकर भरणारे शेतकरी आहेत. उर्वरित ४४.४१ टक्के शेतकरी हे अपात्र शेतकरी गटात मोडणारे आहेत. सरकारच्या आकडेवारीत पैसा चुकीच्या लोकांना मिळाल्याचे म्हटले आहे. या अपात्र शेतकऱ्यात पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

कॉमनवेल्थ ह्यूमन राइट्स इनिशिएटिव्ह’शी (सीएचआरआय) संबंधित माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी ही माहिती सरकारकडून मागविली होती. त्यांनी सांगितले की, अपात्र लाभार्थ्यांमध्ये अर्ध्याहून अधिक (५५.५८ टक्के) लाभार्थी हे ‘प्राप्तिकरदाता’ या गटात मोडतात. उर्वरित ४४.४१ टक्के शेतकरी हे हा निकष पूर्ण करीत नाहीत. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, अपात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेले अर्थसाह्य वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे.

तत्पूर्वी मोदी सरकारची गरिबांना लाभ पोहोचविणारी महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील घोटाळा उघड झाला होता. या योजनेसाठी पात्र नसलेले लोक या योजनेचा लाभ घेत होते, असे स्पष्ट झाले होते. फुलप्रूफ सिस्टममध्ये सुद्धा लोक घोटाळा करू शकतील, असा विचारही कोणी करू शकणार नाही. ज्यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan samman nidhi Scheme) अवैधरित्या पैसे काढण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यावेळी अपात्र म्हणजेच बनावट लोकांची आकडेवारी पाहून सरकार सुद्धा आश्चर्यचकित झाले.

तामिळनाडूमध्ये देखील ५.९५ लाख लाभार्थ्यांच्या खात्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यामधील ५.३८ लाख लाभार्थ्यांची बनावट खाती असल्याचे निदर्शनास आले होते. आता संबंधित बँकांमार्फत बनावट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केलेली रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे, जेणेकरून ही रक्कम केंद्र सरकारच्या खात्यात परत येऊ शकेल आणि ती योग्य ठिकाणी वापरली जाऊ शकेल. आतापर्यंत ६१ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

 

News English Summary: Under the Prime Minister’s Kisan Sanman Yojana, Rs 1,364 crore has been distributed to 20.48 lakh ineligible beneficiaries. The Union Ministry of Agriculture has given this information in the RTI.

News English Title: Money under Prime Minister Kisan Scheme going in wrong hands information under RTI news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x