3 May 2025 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मुच्छड पानवाला नाव समोर आल्यानंतर समीर खान यांनाही NCB 'कडून अटक

NCB raids, Sameer Khan, Minister Nawab Malik

मुंबई, १४ जानेवारी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर धाड टाकली. सध्या एनसीबीकडून याठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे.

यामध्ये नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

शनिवारी अटक केलेल्या सजनानी व अन्य दोन तरुणींकडून एनसीबीने सुमारे २०० किलो परदेशी गांजा जप्त केला आहे. करणच्या खात्यावर समीर खान यांच्याकडून ऑनलाइन २० हजार रुपये पाठविण्यात आले होते. त्यामुळे खार परिसरात राहत असलेल्या समीर यांना चौकशीसाठी समन्स बजाविले होते. त्याअनुषंगाने बेलार्ड पियार्ड येथील एनसीबीच्या कार्यालयात सकाळी १० वाजेपासून त्यांची चौकशी सुरू होती. आर्थिक अडचण असल्यामुळे त्याला पैसे दिले होते, असा खुलासा त्यांनी केला. मात्र, त्याबाबतचा सबळ पुरावा ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे सुमारे ८ वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी फक्त बॉलिवूडच नाही तर उद्योगपती आणि श्रीमंतांची नावे देखील समोर आली आहेत. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करन सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावं समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली.

 

News English Summary: A team from the Narcotics Control Bureau on Thursday morning raided the house of Sameer Khan, son-in-law of NCP spokesperson and Minorities Minister Nawab Malik. The NCB is currently searching for important evidence here. Against this backdrop, Nawab Malik has sent a tweet.

News English Title: NCB raids at Sameer Khan Bandra house intensifies probe after arrest news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NawabMalik(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या