13 December 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

अखेर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही ‘एनआयए’कडे

NIA, Mansukh Hiren's death case

मुंबई, २० मार्च: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIAकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

अंबानी यांच्या घराजवळ एक जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आली होती. ही घटना समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आला होता. मात्र, केंद्राने एनआयएकडे तपास सोपवला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती.

 

News English Summary: The investigation into Mansukh Hiren’s death has now been handed over to the NIA. An official order has been issued by the Union Home Ministry in this regard. This information was given by ‘ANI’ news agency quoting official sources. This is considered a major blow to the anti-terrorism squad investigating the case.

News English Title: NIA will investigate Mansukh Hiren’s death case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x