पॉलिटिकल हनी ट्रॅपर? | मनसे पदाधिकारी मनीष धुरी यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता

मुंबई, १४ जानेवारी: बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. परंतु, आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत.
दरम्यान भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.
मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान रेणू शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर कृष्णा हेगडेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसेच्या मनिष धुरी यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचा दावा केला. त्यानंतर मराठी वृत्तवाहिनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना धुरी यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. ‘कृष्णा हेगडेंना मी फोन केला होता. कारण २००८-०९ मध्ये माझ्यासोबतही असाच प्रकार घडला होता. रेणू शर्मानं मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता,’ असं धुरी यांनी सांगितलं.
रेणू शर्मानं माझ्याशी संपर्क साधला होता. ती मला फॉलो करत होती. त्यावेळी मी मनसेच्या विभाग अध्यक्ष होतो. तिनं माझ्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न केले. तिला व्हिडीओ अल्बम काढायचा होता. त्यासाठी तिच्याकडून ब्लॅकमेलिंग सुरू होतं. तिचा हेतू लक्षात आल्यावर मी पिच्छा सोडवून घेतला. अन्यथा त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता,’ असा दावा धुरी यांनी केला.
तुम्ही त्यावेळी रेणू शर्माविरोधात पोलिसात तक्रार का दाखल केली नाही, असा प्रश्न धुरी यांना विचारण्यात आला. ‘महिलेची बदनामी नको म्हणून त्यावेळी मी शांत बसलो. मी त्या महिलेपासून पिच्छा सोडवला होता. त्यामुळे मी शांत राहिलो. पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर मग तिचा आणि माझा संपर्क आला नाही. कदाचित त्यावेळी ती कृष्णा हेगडे किंवा इतर नेत्यांच्या संपर्कात असावी. २०१८-१९ मध्ये तिनं माझ्याशी संपर्क साधला. पण तिचा हेतू माहीत असल्यानं मी तिला टाळलं,’ असं धुरींनी सांगितलं.
News English Summary: After filing a complaint against Renu Sharma with the police, Krishna Hegde interacted with the media. At that time, he claimed that the same thing happened with Manish Dhuri of MNS. After that, while interacting with Marathi news channel ‘ABP Mazha’, Dhuri told what happened to him. ‘I had called Krishna Hegde. Because the same thing happened to me in 2008-09. Renu Sharma had tried to blackmail me, ‘said Manish Dhuri.
News English Title: MNS leader Manish Dhuri made serious allegations on Renu Sharma news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON