28 April 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

पूर्वी राजकारणात गणेश नाईकांना मानाचं स्थान होतं | भाजपमध्ये बसायलाही खुर्ची मिळाली नाही

State minister Jitendra Awhad, BJP leader Ganesh Naik, Navi Mumbai, Municipal corporation election

नवी मुंबई, १७ जानेवारी: भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील साम्राज्याला हादरा देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत गणेश नाईक यांना हादरा दिल्यास त्यांचं राजकीय भविष्य देखील टांगणीला लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. परिणामी महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मागील 20 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत वर्चस्व आहे आणि तेच मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.

दरम्यान, वाशीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने काँग्रेस नेते अस्लम शेख, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार राजन विचारे आदी नेते या मेळाव्यात उपस्थित आहेत. या निमित्ताने विजय नाहटा यांची पर्यावरण प्राधिकरणाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने अस्लम शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीचा नवी मुंबईतील हा पहिलाच मेळावा आहे.

यावेळी महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. पूर्वीच्या काळात गणेश नाईक यांना राजकारणात आदराचे स्थान होते. मात्र, भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना साधी बसायलाही खुर्ची मिळाली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पण नाईक यांनी त्यांना धोका दिला. बाळासाहेब ठाकरे यांचाही त्यांनी अशाचप्रकारे विश्वासघात केला होता, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गणेश नाईक आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. काही वर्षांनी मोदी आणि अमित शाह नेपाळमार्गे युरोपला पळतील, असे गणेश नाईक म्हणायचे. पण हेच तिकडे पळाले, असे आव्हाड यांनी म्हटले.

 

News English Summary: Mahavikas Aghadi Minister Jitendra Awhad sharply criticised Ganesh Naik. In the past, Ganesh Naik had a place of respect in politics. However, at the first BJP meeting, he did not even get a simple seat, said NCP leader Jitendra Awhad. Sharad Pawar had great faith in Ganesh Naik. But Naik threatened them. He had betrayed Balasaheb Thackeray in the same way, said Jitendra Awhad.

News English Title: State minister Jitendra Awhad slams BJP leader Ganesh Naik over Navi Mumbai upcoming municipal corporation election news updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x