4 May 2024 7:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शिवसेनेला धक्का, २ नगरसेवक, पदाधिकारी व युवासेनेचे कार्यकर्ते भाजपात

ठाणे : मुरबाडमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दोन नगरसेविका, शहर पदाधिकारी आणि युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेत सुद्धा गळती सुरु झाली असून पुढे सुद्धा शिवसेनेला मोठे धक्के दिले जातील असा विश्वास स्थानिक नेत्यांनी बोलून दाखवला.

मुरबाड शहरातील शिवसेनेच्या दोन नगरसेविका साक्षी बाबू चौधरी आणि वैशाली रवीन्द्र शेळके यांच्या सहित शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाबू चौधरी, रवींद्र शेळके, भारत वामन शेलार, अनिल सरनौबत तसेच युवासेनेचे सचिन बांगर, मुरबाड तालुका कुंभार समाज अध्यक्ष सचिन कुंभार, प्रकाश सोनावणे, कुणाल गोडांबे यांच्या सहित शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्यामुळे शिवसेनेला हा मुरबाडमध्ये जोरदार धक्का भाजपकडून देण्यात आला आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ आली असताना शिवसेनेला हा धक्का बसला आहे. या वेळी मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत खासदार कपिल पाटील, आमदार किसान कथोरे आणि शहरातील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x