मुंबई : शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत पाणीपट्टीत ३.७२ टक्क्यांनी वाढ झाली असून १६ जूनपासून ही नवी दरवाढ लागू होणार असून त्याला शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या स्थायी समितीतील प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली दिली आहे. त्यामुळे महागाईत होरपळलेला सामान्य माणसाला अजून कठीण परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे.
मुंबई महानगर पालिकेतील जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, देखभाल खर्च, विजेचा खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या एकत्रित खर्चात दरकर्षी वाढ होत असते. त्यामुळे नवीन प्रस्तावानुसार ३.७२ टक्क्यांच्या वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला ज्याला बहुमताने मजुरी देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जाहीर केले.
मुंबई महानगर पालिकेमार्फत शहरवासीयांना पुरेसे, भरपूर आणि शुद्ध पाणी देण्यात येते. ही दरवाढ पाण्याचे शुद्धिकरण आणि मुंबईत पाणी आणण्याचा खर्च यामध्ये होणाऱ्या वाढीमुळे अशी पाणीपट्टीत वाढ केली जाते. त्यामुळेच या दरवाढीला विरोधही होत नाही व यातून महापालिकेच्या महसुलात ४१ कोटीची वाढ होणार आहे असं मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.
