6 May 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

तिसरी लाट | लहान मुलांना कोरोनापासून कसं सुरक्षित ठेवता येईल यासाठी मुख्यमंत्री सतर्क | महत्वाच्या बैठका

Maharashtra corona pandemic

मुंबई, २३ मे | देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यामुळे आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण आलेले आहे. यातच आता तज्ञांकडून कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देशातील 35 टक्के लोक तिसऱ्या लाटेच्या विळ्याख्यात येत असून याचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बाल आयोगाने प्रत्येक राज्यांतील आयसीयू बेडसह 22 उपकरणांचा डेटा मागितला आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) प्रत्येक राज्यांना लहान मुलांसाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधांची आकडेवारी एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरोग्याच्या पायाभूत सुविधांची काय स्थिती आहे, हे दुसर्‍या लाटेदरम्यान सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे देशात सध्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेची मोठी समस्या आहे. विद्यमान पायाभूत सुविधा देखील पूर्णपणे कार्यरत नसल्याचे एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, वैद्यकीय यंत्रणेत तांत्रिक तंत्रज्ञांची कमतरता आणि निष्काळजी वृत्तीमुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाचे नवीन प्रकरणे वाढले आहे.

दुसरीकडे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर्सशी संवाद साधला. त्यामुळे राज्य सरकार लहान मुलांच्या बाबतीत अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय.

कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

News English Summary: A Pediatric Task Force has been set up to prevent covid infections in infants and children. This pediatrician task force guided pediatricians in the state. On this occasion, Chief Minister Uddhav Thackeray also interacted with the doctors. Therefore, the state government has become more vigilant in the matter of children.

News English Title: CM Uddhav Thackeray conversation on prevention of Covid in children by Maharashtras pediatric taskforce news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x