2 May 2024 8:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

राहती घर खाली करण्यासाठी पोलिस कुटुंबियांवर वरिष्ठांचा दबाव | राज ठाकरेंकडे मांडली कैफियत

Mulund Police colony, residence, MNS chief Raj Thackeray

मुंबई, १८ फेब्रुवारी: जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी काल कृष्णकुंज येथे गेले होते. त्यानंतर आज मुंबई पोलीस कुटुंबीयांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

पोलिसांना हक्काची घर मिळाली पाहिजेत तसेच पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हक्कांसाठी राज ठाकरे नेहमीच पुढे राहिले आहेत. आता मुंबईत राहणाऱ्या काही पोलिसांवर राहती घर रिकामी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळेच पोलिसांच्या पत्नींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांच्या पत्नींना धीर देत वरिष्ठांशी बोलण्याचे आश्वासन दिले. राहती घर रिकामी करण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबियांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव आणला जातोय. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. “तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो” असे राज ठाकरेंनी पोलिसांच्या पत्नींना आश्वासन दिले.

 

News English Summary: Raj Thackeray has always stood up for the rights of the police and their families. Now some policemen living in Mumbai are being pressured to vacate their homes. That is why the wives of the police met MNS president Raj Thackeray today.

News English Title: Mulund Police colony residence meet MNS chief Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x