अहमदाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा २०११ मधील गुजरात दौरा राजकीय चर्चेचा विषय बनला होता. तसा राज ठाकरेंचा दौरा हा गुजरात सरकारच्या खास निमंत्रणावरून ठरला होता आणि तो दौरा सर्वांसाठी सार्वजनिक विषय होता. परंतु प्रसारमाध्यांपासून लांब राहून आणि ठीक २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची गुजरातमध्ये जाऊन भेट घेतली होती, त्या भेटीमागचं मूळ राजकीय कारण प्रसारमाध्यांच्या नजरेतून का सुटलं होत?

राज ठाकरेंच्या त्याच २०११ मधील गुजरात दौऱ्यानंतर त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन दौऱ्याबद्दलची सर्व माहिती प्रसार माध्यमांना स्वतःहून दिली होती. परंतु शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई सुद्धा २०१३ मध्ये आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले होते, परंतु त्यांच्यामधील चर्चेची वाच्यता कोठेच सार्वजनिक करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे त्या गुजरात दौऱ्यात त्यांनी नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी जवळजवळ सव्वा तास बैठक घेऊन चर्चा केली होती.

प्रथम शिवसेनेचा नरेंद्र मोदींच्या नावाला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्ह्णून विरोध होता जो नंतर मावळला होता. परंतु २०१४ मधील लोकसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेने केवळ राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचे भांडवल करत, मतदारांमध्ये नकारात्मक संभ्रम निर्माण केला होता. वास्तविक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुजरात दौरा हा गुजरात सरकारच्या निमंत्रणावरूनच झाला होता. तो त्यांनी घडवून आणला नव्हता. तसेच मनसे अध्यक्षांचा तो दौरा २०११ मध्ये म्हणजे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या खूप आदी झाला होता. त्याउलट उद्धव ठाकरेंचा दौरा ठीक २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या २-३ महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर २०१३ मध्ये झाला होता.

तत्कालीन सर्व मुद्दे आणि एकूणच घडलेल्या तत्कालीन लोकसभा निवडणूकपूर्व हालचाली या शिवसेनेविरुद्ध असताना सुद्धा सेनेतील चाण्यक्यांनी प्रसार माध्यमांमार्फत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोवती संभ्रमाचं वलय निर्माण करण्यात यश मिळवलं होत हे वास्तव आहे. परंतु तेच राजकीय विश्वासार्हतेच वलय आता शिवसेनेविरुद्ध सुद्धा पलटू शकत अशी परिस्थिती शिवसनेच्या सत्ताकाळाने निर्माण केली आहे. त्याचाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे कसा चाणाक्ष पणे राजकीय फायदा घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Why shivsena chief Udhav Thackeray was meet to CM Narendra Modi in 2013 before lok sabha Election of 2014