7 May 2025 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

आंतरराष्ट्रीय शिक्षण! मोदी बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत - शशी थरूर

congress, Shashi Tharoor, PM Narendra Modi, Bangladesh

मुंबई, २७ मार्च: बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरुन समाज माध्यमांवर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. काँगेसचे नेते शशी थरूर यांनी देखील मोदींवर खोचक टीका केली आहे.

बांगलादेशच्या लढ्यात मी सहभागी झालो होतो. त्यावेळी मला अटक झाली होती आणि तुरुंगातही जावं लागलं होतं,” असं मोदी म्हणाले होते. मोदी यांच्या या विधानावरून शशी थरूर यांनी टीका केली आहे. “आंतरराष्ट्रीय शिक्षण : आपले पंतप्रधान बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की, बांगलादेशला कुणी स्वातंत्र मिळवून दिलं,” अशी टीका थरूर यांनी केली होती.

 

News English Summary: International education our Prime minister is giving Bangladesh a taste of Indian fake news. The absurdity is that everyone knows who liberated Bangladesh said congress leader Shashi Tharoor.

News English Title: congress leader Shashi Tharoor criticised PM Modi over his statement about Bangladesh news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या