29 April 2024 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

फडणवीसांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील फरक कळतो? पॅकेज निमित्ताने भलतेच सल्ले

Minister Jitendra Awhad, Devendra Fadnvis, lockdown

मुंबई, ३ एप्रिल: सध्या देशभरात कोरोनामुळे चिंता वाढताना दिसत आहे. मात्र परदेशात भारतापेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं दिसत आहे. परिणामी मागील अनुभव पाहता तिथल्या देशातील सरकारने लॉकडाउन करण्यापूर्वी सामान्यांच्या दृष्टीने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. एका बाजूला अशी स्थिती असताना स्वतःला अभ्यासू नेते म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील नेते देखील सल्ले देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. फडणवीसांनी देखील तसाच सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला आहे. मात्र फडणवीसांना सल्ला आठवला तेव्हा त्यांना देशातील सरकार आणि राज्य सरकार यातील फरक समजला नसल्याची टीका सुरु झाली आहे. कारण जो सल्ला त्यांनी मोदी सरकारला द्यायला हवा होता तो ते राज्य सरकारला देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर परदेशातील केंद्र सरकारांनी केलेल्या मदतीचे दाखलेही दिले. त्यासंदर्भात ट्विट करत त्यांनी संबंधित देशाचं नाव आणि जाहीर करण्यात आलेलं पॅकेज देखील सांगितलं आहे.

दरम्यान, फडणवीसांनी दिलेल्या दाखल्यांचा समाचार घेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाड यांनी फडणवीसांचा मुद्दा खोडून काढतानाच केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “…पण हे सगळं तिथल्या केंद्र सरकारनी केलं आहे. आपलं केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाहीत. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून…,” असं म्हणत आव्हाडांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

 

News English Summary: After the Chief Minister’s dialogue, Leader of Opposition Devendra Fadnavis castigated the Mahavikas Aghadi government. He also gave evidence of assistance provided by the Central Government abroad. He also tweeted the name of the country concerned and the package announced.

News English Title: Minister Jitendra Awhad slams Devendra Fadnvis over his advice regarding package before lockdown news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x