4 May 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

मुंबई गुजराती समाज आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंची रोखठोक मराठी भूमिका

मुंबई : मुंबई बोरिवली येथे श्री. विनूभाई वालीया प्रेरीत दादा-दादी पार्क या गुजराती समाजातील संस्थेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एक बैठकी आयोजित केली होती. या बैठकीत अनेक समस्यांवर मुक्त संवाद साधण्यात आला.

उपस्थिता गुजराती समाजाच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठी बाणा उपस्थितांना पाहावयास मिळाला. राज ठाकरे म्हणाले की,’आपण आपआपल्या उद्योग-व्यवसायात उत्तम काम करता, मी तुमच्या पाठीशी आहे. परंतू तुम्हाला देखील महाराष्टाचा, मराठी भाषेचा, मराठी माणसाचा व इथल्या मातीचा मान ठेवावाच लागेल’ अशा स्पष्ट शब्दात राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. विनूभाई वालीया प्रेरीत दादा-दादी पार्क या ट्रस्ट मार्फत करण्यात आलं होत. त्यानिमित्त महाराष्ट्रातील गुजराती समाजाची भूमिका आणि महाराष्ट्राची भूमिका या संबंधित अनेक प्रश्नांवर मुक्त संवाद साधण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांची महाराष्ट्र आणि मराठी प्रति असलेली स्पष्ट भूमिका उपस्थितांसमोर मांडली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x