4 May 2024 6:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

वांद्रे पूर्व विधानसभा | जनसंपर्क तुटलेल्या तृप्ती सावंत भाजपच्या संपर्कात | आज प्रवेश झाला

Shiv Sainik, Trupti Sawant, joined BJP

मुंबई, ६ एप्रिल: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील माजी शिवसैनिक तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात तृप्ती सावंत मागील काही महिन्यांपासून जनसंपर्काची बाहेर होत्या तसेच त्यांच्याभोवती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं वलय उरलं नसल्याने राजकीय प्रवास खडतर झाला होता. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या मतदार संघातील राजकीय स्थिती पाहता त्यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता असं म्हटलं जातंय.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी यांनी महापौर महाडेश्‍वर यांचा पराभव केला होता. बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांच्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाले. झिशान यांचे पिता बाबा सिद्दिकी या मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 असे तीनवेळा निवडून आले होते. तृप्ती सावंत यांचे पती दिवंगत बाळा सावंत याच मतदारसंघातून विजयी झाले होते. मागील वेळी निवडून आलेल्या तृप्ती सावंत यांना पुन्हा उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. विशेष म्हणजे त्यांना एक सुप्त सहानुभूती देखील मिळाल्याने त्यांना फायदा झाला होता. पण तो शिवसेनेचा उमेदवार पाडण्यापुरता मर्यादित होता.

काँग्रेसचे विजयी उमेदवार झिशान सिद्दीकी यांना ३७ हजार ६३६ मतं मिळाली होती. तर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांना २३ हजार ०६९ मतं मिळाली होती. झिशान सिद्दीकी यांनी १४ हजार ५६७ मतांनी महाडेश्वरांचा पराभव केला होता. तसंच शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांना सहानुभूती मिळाल्याने २३ हजार ८५६ मतं मिळाली होती. त्यामुळे शिवसेनच्या पराभवाचे प्रमुख कारण तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारली असल्याचे बोलले गेले होते. तर, मनसेच्या अखिल चित्रे यांना १० हजार ४०३ मतं मिळाली होती.

 

News English Summary: Shiv Sainik Trupti Sawant from Bandra East Assembly constituency has joined BJP. In the constituency where Chief Minister Uddhav Thackeray resides in Bandra East, Trupti Sawant has been out of public relations for the last few months and the political journey has been tough as there is no circle of office bearers and activists around him. But he has now joined the BJP.

News English Title: Shiv Sainik Trupti Sawant from Bandra East Assembly constituency has joined BJP news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x