3 May 2024 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

केंद्राकडून वेळेत लस पुरवठा न झाल्यास ३ दिवसांमध्ये लसीकरण बंद पडेल - आरोग्यमंत्री

Supply of vaccines, health minister Rajesh Tope, Modi govt

मुंबई, ७ एप्रिल: महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लशीच्या पुरवठ्या संदर्भात टोपे यांनी यावेळी केंद्रावर संताप देखील व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,” अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

देशात सर्वाधिक लसीकरण मुंबईसह महाराष्ट्रात सुरु असतानाच लसीचा साठा संपत आल्याची बातमी स्वतः महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनीच हे वास्तव उघड केले आहे. त्यांनी संतापाने केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे, “सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. ‘वरवर माया आणि पोटभर जेव ग बया’ असं केंद्र सरकारचं सुरू आहे. आम्ही जर लसीकरण करायचंय तर आम्हाला मिळायला तर पाहिजे ना.. आम्ही सगळे नियम पाळतो आहोत. राज्य सरकाराने केंद्राला पत्र ही पाठवलं तरी आम्हाला लस मिळत नाही”

राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात मुंबई देखील मागे नाही. मात्र, अशास्थितीत मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत पुढील २ ते ३ दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. “मुंबईत सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे मिळून १ लाख ८५ हजार डोस शिल्लक आहेत. तसेच मुंबईला मिळणारा पुढचा लसींचा साठा हा १५ एप्रिलनंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसांत मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो”, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

 

News English Summary: Maharashtra has taken the lead in the country in terms of vaccination. However, the supply of vaccines from the central government is declining, said state health minister Rajesh Tope. He was speaking at a press conference in Mumbai today. Tope also expressed outrage at the center this time over the supply of vaccines.

News English Title: Supply of vaccines from the central government is declining said state health minister Rajesh Tope news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x