तुम्ही गेल्या वर्षी लोकांना थाळ्या-टाळ्या वाजवायला सांगितल्या, त्याने काय झाले? | दुसऱ्या लाटेला मोदी सरकारच जवाबदार

नवी दिल्ली, २७ एप्रिल | भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत थोडी फार घट होताना दिसत आहे.भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे.
दरम्यान देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख ८२ हजार २०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण झालं आहे.
दरम्यान, देशात कोरोनाच्या थैमानामुळे सामान्य माणूस होरपळून निघालेला असताना ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, आपण गेल्या वर्षी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितले होते, त्याने काय झाले? देशातून कोरोना पळाला?”
ओवेसी म्हणाले पंतप्रधान मोदींनी रुग्णालायांतीत सुविधा का वाढविल्या नाहीत? केंद्र सरकार तेव्हापासून झोपले होते का? देशाच्या राजधानित ऑक्सिजन का कमी पडतोय? आपण आत्मनिर्भर भारत आहोत, तर सौदी अरेबिया, रशिया आणि इतर देशांची मदत का घेत आहोत. मृतांचे दफन केले जात आहे. शव जाळले जात आहेत. आणि मोदी सरकारला रक्ताचा सुगंध येत आहे. मोदी सरकार अदृश्य झाले आहे. आमच्याकडे MP फंड असता, तर आम्हाला लोकांना ऑक्सिजन अथवा औषधी देता आली असती. मात्र, आता काहीही नाही, असे ओवेसी म्हणाले.
मोदी सरकारने पीएम केअर्स फंडातील पैसे काढून राज्य सरकारांना द्यायला हवेत. जेने करून त्यांना कोरोना लसीकरणाचा वेग वाढवता येईल, असे म्हणत, सध्या देशात कोरोना लशींच्या तुटवड्याची चर्चा सुरू आहे. असे असेल, तर यापूर्वीच फायझर कंपनीला भारतात लस लॉन्च करण्याची परवानगी का देण्यात आली नही, असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला.
News English Summary: MIM MP Asaduddin Owaisi has strongly criticized the Modi government while the common man has fled the country due to the coronation. That said, you asked people to clap and clap last year, what happened to that? Corona fled the country?
News English Title: MIM MP Asaduddin Owaisi criticized Modi Govt over Indian corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER