28 April 2024 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Health First | मैदा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक कसा आहे हे जाणून घ्या

side effects of using refined flour

मुंबई २७ एप्रिल : गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा. मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मैदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतडय़ामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हेही आजार वाढीस लागतात. मद्यामध्ये शरीराला पोषक अशी नसíगक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते.

जाणून घ्या मैद्यापासून होणारे शरीराचे नुकसान

१) मैदा लठ्ठपणा वाढवितो- जास्त प्रमाणात मैदा सेवन केल्याने शरीराचे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून रक्तात ट्रायग्लिसराइड वाढतात. आपल्याला वजन कमी करायचे असल्यास मैदापासून बनवलेले खाद्यपदार्थ आहारातून वगळावेत.

२ ) मैदा पोटासाठी हानिकारक मैदा पोटासाठी योग्य नाही कारण त्यात फायबर नसतात .

३) रोग होण्याचे प्रमाण वाढते.मैदा नियामित खाल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होवून वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते.

४) मधुमेहाचा धोका- मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी लगेच वाढते कारण मैद्यात खूप उच्च ग्लिसमिक निर्देशांक असतो. म्हणून जर आपण जास्त मैदा खाल्ला तर स्वादुपिंडाची तक्रार सुरू होईल कारण ती स्वादुपिंडाचे काम कमी होवून शरीरातील इन्सुलिन वाढेल आणि मधुमेह वाढेल.

५) फूड ॲलर्जी मैद्यात ग्लूटन असल्यामुळे फूड ॲलर्जी होते. मैद्यात असलेल्या ग्लूटनामुळे खाद्यपदार्थ मऊ व चिवट बनतात याऊलट गहूत भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटीन असते.

६ ) हाडे कमजोर होणे मैदाचे पीठ बनवताना त्यातील फायबर पूर्णपणे नाहीसे करतात त्यामुळे असे पीठ हाडातील कॅलशिअम पूर्णपणे नाहीसे करते व हाडे कमजोर होतात.

७) रोगप्रतिकारक शक्ती कमी होते मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. वारंवार आजारी पडण्याची शक्यता बळावते.

मैद्याला पर्यायी पदार्थ

सर्व पदार्थ बनविण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा मैद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.मुलांना पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नैसर्गिक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वाचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही.

News English Summary: Refined flour is a white flour made from the flour of wheat flour. Wheat husk is removed while making flour. All bran in the wheat is removed to the side. Since it contains all kinds of minerals, Refined flour is a nuisance. It is of no use for health. But since it is easy and instant to make food from flour, flour has penetrated everywhere from hotels to kitchens. Everyone uses flour in their daily diet without knowing its properties.

News English Title: Use of refined flour is not safe to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x