23 November 2019 8:13 AM
अँप डाउनलोड

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बालाकोट एअर स्ट्राइकचा प्रमोशनल VIDEO प्रसिद्ध

Balakot Air Strike, Indian Air Force, IAF, Pakistan, Indian Army

नवी दिल्ली : पुलवामात फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. या एअरस्ट्राइकचा व्हिडिओ भारताच्या हवाई दलाने जारी केला आहे. या व्हिडिओत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं दिसतं आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांना भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून उद्ध्वस्त केलं होतं.

भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये मंगळवारी पहाटे मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमधील अनेक परिसरात बॉम्ब हल्ले केले. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी ठार झाले. सुमारे २०० ते ३०० दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले. भारतीय वायुसेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे ६० किमी आत घुसली होती. यावेळी ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचे सर्व तळ नेस्तनाबूत केले होते.

भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीच्या पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-महम्मदच्या तळावर हवाई हल्ले करुन हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान ‘जैश-ए-महम्मद’च्या भीषण हल्ल्याला उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.

फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या पाच वैमानिकांचा त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव आले आहे.

एअर स्ट्राईक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हद्दीत घुसखोरी करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानी हवाई दलाच्या फसलेल्या प्रयत्नाचा उल्लेखदेखील प्रमोशनल व्हिडीओत आहे. पाकिस्तानचा डाव भारतीय हवाई दलाच्या शूर वैमानिकांनी हाणून पाडत त्यांना माघार घ्यायला लावली, अशी माहिती व्हिडीओत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1049)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या