2 May 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल
x

७० वर्षात प्रथमच आत्मनिर्भर भारत बांगलादेश, नेपाळ, बहरीन आणि रवांडा या देशांकडून मदत घेतोय - काँग्रेस

Congress leader Srivatsa

नवी दिल्ली, ०९ मे | मागील महिन्यापासून भारतासाठी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे आणि अजूनही ते सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मागील आठवड्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा आणि अँटी व्हायरल औषधांची विमानं मोठ्या प्रमाणावर भारतातील विमानतळांवर उतरल्याचे अनेक वृत्तांमध्ये समोर आलं आहे. नवी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने पार्सल लोड केल्याचे फोटोसह देशाने पहिले आहे. पण काही दिवसांपासून बहुतेक मालवाहू विमानतळ हँगर्समध्ये खोळंबून बसली आहेत. कारण रुग्णालये आणि त्याप्रमाणे वितरण कसं करावं याबाबत मोदी सरकारमध्ये गोंधळ असल्याचं म्हटलं जातंय.

अनेक राज्यांमध्ये आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन अजूनही कोरोना संबंधित मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर केवळ मागणी करत आहेत जी त्यांना अजूनही मिळत नाही. ज्यामुळे आरोग्य सेवा अनेक राज्यांमध्ये कोलमडल्याचं पाहायला मिळतंय. याच परदेशी मदतीवरून आता अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय.

विशेष म्हणजे शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अमेरिकेची भारताला गेलेली मदत नेमकी कुठे आहे, असा प्रश्न विचारला गेला. पत्रकाराने थेट अमेरिकेतील करदात्यांच्या पैशासाठी तुम्ही उत्तरदायित्व असल्याचं प्रशासनाला म्हटलं. आपण येथून मदत पाठवत आहोत, पण त्याचं भारतात योग्यप्रकारे वितरण केलं जातं आहे हे तपासण्यासाठी तुम्ही काय करत आहात असा प्रश्न थेट पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, मागील काही काळापासून भारत नेहमी जगभरातील छोट्या देशांना मदत करत आला आहे. मात्र नेमकं उलटं चित्र पाहायला मिळतंय. याच विषयाला अनुसरून काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना श्रीवत्सा यांनी म्हटलंय की, “मागील ७० वर्षांपासून प्रथमच आत्मनिर्भर भारताने बांगलादेश, नेपाळ, बहरीन, रवांडा, उझबेकिस्तान आणि अशा अनेक देशांची मदत घेतली आहे.

 

News English Summary: Modi promised New India. And he has delivered New India! For the first time in 70 yrs, ‘Aatma Nirbhar’ Bharat has taken aid from, Bangladesh, Nepal, Bahrain, Mauritius, Rwanda, Uzbekistan and most other countries in the world. Modi is making India into a basket case said congress leader Srivatsa news updates.

News English Title: Congress leader Srivatsa slams Modi govt over taking help from poor countries even called Atmanirbhar Bharat news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x