13 October 2024 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही? - शरद पवार

Sharad Pawar, Masjid, Ram Mandir, Ayodhya

लखनऊ: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टची बुधवारी दिल्लीमध्ये पहिली बैठक पार पडली. या ट्रस्टवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. ‘राम मंदिराच्या उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“तुम्ही जसं राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता, मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्ट का निर्माण करू शकत नाही ? देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे.” असं शरद पवार म्हणाले आहेत. ‘एएनआय’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

अयोध्येतील वादग्रस्त भूमीवर राम मंदिर होते, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तसेच तिथे राम मंदिर बांधण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा संसदेत केली होती. त्यानंतर बुधवारी या ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाला होती. या बैठकीत महंत नृत्य गोपाल यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

 

English summary: Form trust for mosque in ayodhya, NCP President Sharad Pawar Demands, The Supreme Court verdict that the Ram temple was located on the disputed land of Ayodhya in Uttar Pradesh.

 

Web Title: Story NCP President Sharad Pawar asks question PM Modi government why do you not constitute trust for Masjid.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x