27 June 2022 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल
x

आदित्य यांचं मिशन 'शिवसेना इमेज बिल्डिंग'; प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाणार? - सविस्तर वृत्त

Minister Aaditya Thackeray, Priyanka Chaturvedi

मुंबई : एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत आहेत.

राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी उत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट आदित्य ठाकरे यांच्यामार्फत ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या सर्वात पुढे दिसतात.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या ‘आदित्य संवाद’ या इव्हेंटमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची प्रमुख भूमिका होती आणि त्या सतत आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळालं होतं . नुकतीच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या कार्यालयांना भेट दिली होती आणि त्यावेळी देखील प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होत्या. दिल्लीत पक्षाची इमेज बिल्डिंग करण्याच्या दृष्टीने पारंपरिक उमेदवारांना बगल देत, हिंदी, इंग्लिश अशा भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या आणि सर्वच पक्षांना परिचित असणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे पुढाकार घेण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे सध्या पर्यावरण या विषयांवरून निरनिराळ्या देशांच्या राजदूतांच्या भेटी घेत असून त्यात देखील प्रियांका चतुर्वेदी महत्वाची भुमीका बजावत आहेत. अप्पर मिडल क्लासमध्ये शिवसेनेबद्दल काहीशी नाकाराम्तक विचारधारणा आहे आणि ती देखील बदलण्याचा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न दिसतो. त्यासाठी आवश्यक असणारे चेहरे समोर आणणे आणि राज्यसभेत पक्षाची निरनिराळया विषयावरून वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा आदित्य ठाकरे यांचा निश्चय दिसतो आणि त्यामुळे त्यांचा एकूण दिनक्रम पाहिल्यास ‘इमेज बिल्डिंग’ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं दिसतं.

अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असाही पक्षात मतप्रवाह आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत आहेत. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक असल्याची चर्चा आहे. मात्र आदित्य ठाकरे प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी आग्रही असल्याचं वृत्त आहे.

राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या ७ जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

 

Web Title: Story Shivsena may give opportunity to Priyanka Chaturvedi on Rajyasabha.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x