4 December 2022 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

जर्मनीत बारमध्ये गोळीबार, ८ जणांचा मृत्यू

Story shooting in German city

बर्लिन : जर्मनीच्या दोन बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जर्मनीच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी शहराच्या शिशा बारमध्ये गोळीबार केला. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता घडली आहे.

स्थानिक वृत्तवाहिनींच्या माहितीनुसार हुक्का बारमध्ये हा गोळीबार झाला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. पहिल्या हुक्काबारमध्ये गोळीबारानंतर एक कार तिथून निघून गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं. ८ ते ९ बंदुकीच्या गोळ्या झाडून आरोपी पसार झाला. थोड्याच वेळात काही दूर असलेल्या हुक्का बारमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना घडली. यात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

बारमध्ये गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरुन फरार झाल्या. सध्या पोलीस बार परिसरात असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पहिल्या बारमध्ये तिघांचा, तर दुसऱ्या बारमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हनाऊ फ्रँकफर्टपासून २५ किलोमीटर अंतरावर असून इथली लोकसंख्या १ लाखाहून जास्त आहे.

 

Web Title: Story shooting in German city leaves at least eight peoples dead.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x