5 May 2024 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
x

अंधभक्तांचा भाव ४० पैसे वरून २ रुपये? | योगींचं टूलकिट ऑडिओ क्लिप व्हायरल | सपोर्ट करणाऱ्याला २ रुपये

CM Yogi Adityanath Toolkit audio

लखनऊ, ०१ जून |  काँग्रेस-भारतीय जनता पक्षातील टूलकिट वाद अजून शमलेला नसताना नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. कारण आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यात योगी आदित्यनाथ सपोर्ट करणाऱ्यांना २ रुपये देणार असल्याचं सांगत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या समाज माध्यमांच्या टीमचा हा ऑडिओ असल्याचा दावा केला जात आहे.

टूलकिट प्रकरणाचा हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आयटी सेलचे प्रमुख मनमोहन सिंह यांना काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणाचा भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काही संबंध नसल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी केला आहे. हा एका खासगी कंपनीशी संबंधित वाद असल्याचं शुक्ला यांचं म्हणणं आहे.

ही ऑडिओ क्लिप निवृत्त सनदी अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर योगींच्या सोशल मीडिया टीमवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर, भाजपने या प्रकरणापासून अंग झटकलं असून कंपनीने कुणाला ठेवावं आणि कुणाला नाही ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे, असं भाजपने म्हटलं आहे.

दरम्यान, आयटी हेडपदावरून हकालपट्टी केल्यानंतर मनमोहन सिंह यांनी ट्विट केलं आहे. ‘हजारों जवाबों से अच्छी हमारी खामोशी न जाने कितने सवालों की आबरु रख लेगी’ असं सूचक ट्विट सिंह यांनी केलं आहे. त्यामुळे या ट्विटचे अनेक अर्थ लावले जात आहेत.

वायरल ऑडियो मध्ये काय आहे?
पहिली व्यक्ती – ये बताओ कि ये दो रुपए ट्वीट किस हिसाब से मिलता है?
दुसरी व्यक्ती : ये 100+ फॉलोअर्स वालों के लिए है भाई।
पहिली व्यक्ती : अच्छा ये बताओ कि कौन सा हैशटैग होगा?
दुसरी व्यक्ती : ग्रुप में डाला तो है हैशटैग
पहिली व्यक्ती : योगी जी वाला हैशटैग?
दुसरी व्यक्ती : हां… योगी जी वाला हैशटैग
दुसरी व्यक्ती : कोई दिक्कत है क्या ?
पहिली व्यक्ती : नहीं.. हम ज्यादा से ज्यादा कराना चाह रहे हैं, जिससे थोड़ा बढ़ जाए।
दुसरी व्यक्ती : इसमें थोड़ा कम पेमेंट बचा है। क्योंकि 25 ट्वीट मांग रहा है। दूसरा ये कि हैशटैग के साथ… योगी जी के फेवर में। मतलब योगी जी के बारे में अच्छा लिखो।
पहिली व्यक्ती : किसका ट्रेंड है?
दुसरी व्यक्ती : ये तुम छोड़ों न। ये अतुल जी का ट्रेंड है। गजेंद्र चौहान का ट्रेंड है। तुम एक ID से 25 ट्वीट कराओ। उसका पेमेंट कर देंगे।
पहिली व्यक्ती : ठीक
दुसरी व्यक्ती : सबका लिंक ग्रुप में डाल देना। जल्दी कराओ, फोटो के साथ।

 

News English Summary: While the toolkit dispute between the Congress and the Bharatiya Janata Party has not yet subsided, a new controversy is likely to erupt. Because now another case has come up. An alleged audio of Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has gone viral. In it, Yogi Adityanath is saying that he will give Rs. 2 to the supporters. It is claimed to be the audio of Yogi Adityanath’s social media team.

News English Title: Uttar Pradesh CM Yogi Adityanath Toolkit audio viral BJP spokesperson clarification on it news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x