6 May 2024 4:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमधील भेट राजकीय नव्हती | फडणवीसांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं - अशोक चव्हाण

Maratha reservation

मुंबई, ०८ जून | पंतप्रधान मोदींसोबत आज झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत, त्या भाजपप्रणित आहेत. विरोधकांनीही आपलं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि बाजू मांडावी, असं आव्हान चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला आणि काही संघटनांना दिलं आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं चव्हाण म्हणाले. तसंच ही भेट राजकीय तडजोडीसाठी नव्हती. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं. त्यांना उलट आनंद वाटला पाहिजे, असा टोलाही चव्हाण यांनी लगावलाय.

दरम्यान, मोदी आणि ठाकरे यांच्यात अर्धा तास झालेल्या वैयक्तिक भेटीबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेत्यांना टोला हाणलाय. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्येही एकांतात झालेल्या चर्चेनंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी चर्चा तर होणारच, अशा शब्दात राऊतांनी विरोधकांना टोला लगावलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कुणाच्याही मध्यस्तीशिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं हे महत्वाचं असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

 

News English Summary: The organizations that are making anti-Prime Minister statements about today’s meeting with Prime Minister Modi are BJP-affiliated. Ashok Chavan has challenged the BJP and some other organizations to take their delegation to the Prime Minister and present their case.

News English Title: The organizations are making anti-Prime Minister statements about today’s meeting with Prime Minister Modi are BJP affiliated said Ashok Chavan news updates.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x