3 May 2025 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

बीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी

Minister Dhanjay Mundey

मुंबई, 10 जून | बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्यात येणार आहे. सिरसाळा येथे MIDC उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर ही एमआयडीसी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीवर औद्योगिक क्षेत्र – 2 अंतर्गत एमआयडीसी उभारण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाला केली होती. विधानसभा निवडणुकीच्यानंतर झालेल्या अधिवेशनादरम्यान या संदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली होती. त्याला अखेर उद्योग विभागाने मंजुरी दिली आहे. देसाई यांचे खाजगी सचिव उमेश वाघ यांनी मुंडेंच्या कार्यालयास पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

एमआयडीसीसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीची उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया उद्योग विभागामार्फत सुरू होती. मुंडे स्वतः याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते. दरम्यान उद्योग विभागाने मोठा निर्णय घेत, परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने मुंडे यांचे वचनपूर्तीकडे हे मोठे पाऊल मानले जात आहे.

 

News English Summary:  MIDC will be set up at Sirsala in Parli taluka of Beed district. The proposal to set up MIDC at Sirsala has been approved by the Maharashtra Ministry of Industries. After the efforts of the state’s social justice minister Dhananjay Munde, the way has been paved for setting up this MIDC.

News English Title: MIDC will be set up at Sirsala in Parli taluka of Beed district said social justice minister Dhananjay Munde news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या