Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
Amazon Great Freedom Festival 2022 | कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल २०२२ ची घोषणा केली आहे. हा सेल ६ ऑगस्टपासून सुरू होणार असून १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अॅमेझॉन दरवर्षी ऑगस्टमध्ये ग्रेट फ्रीडम सेल घेऊन येते. या सेलमध्ये ग्राहकांना नेहमीप्रमाणे स्मार्टफोनपासून रेफ्रिजरेटर्सपर्यंतच्या वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे. जाणून घेऊयात ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2022 मध्ये कोणत्या ऑफर्सचा लाभ घेता येईल.
तुम्हाला अनेक उत्तम ऑफर्स मिळतील :
* आयफोन १३ सीरिजबाबत ग्राहकांच्या खूप अपेक्षा आहेत. अॅपल आयफोन 14 सप्टेंबरमध्ये लाँच करणार असल्याने आयफोन 13 च्या किंमती या सेलमध्ये घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्राहक हा फोन मूळ किंमतीच्या जवळपास निम्म्या किंमतीत खरेदी करू शकतात.
* अॅमेझॉनने यावर्षी एसबीआय कार्डसोबत पार्टनरशिप केली असून, त्याअंतर्गत ग्राहकांना 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
* अॅमेझॉनवर पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. या दरम्यान लॅपटॉप, होम अप्लायन्सेस, गेमिंग अॅक्सेसरीज, स्मार्ट स्पीकर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर ऑफर्स उपलब्ध असतील.
* या ऑफर्सची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर या ऑफर्स उपलब्ध होणार असल्याची खात्री पटली आहे. अॅमेझॉनच्या प्रमोशनल पेजनुसार, याच्या इको डिव्हाईसवर 45 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते, तर किंडलला 3,400 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
* अॅमेझॉनच्या फायर टीव्ही डिव्हाईसवर 44 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. लॅपटॉप कॅटेगरीमध्ये खरेदीदारांना काही नोटबुकवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.
स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट :
स्मार्टफोनवरील ऑफर्स पूर्वीसारख्या उत्साहवर्धक नसल्या, तरी यंदा गोष्टी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अॅमेझॉनच्या प्रमोशन पेजवर स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. सोनी, सेनहाइजर, बोस यांसारख्या ब्रँडचे टॉप-क्वालिटी हेडफोन्स या सेलदरम्यान सहसा सवलतीत दिले जातात, त्यामुळे या ऑफर्सवर लक्ष ठेवा. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये महागड्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर दरवर्षी उत्तमोत्तम ऑफर्स इथे दिल्या जातात. देशात अॅमेझॉनची स्पर्धा ई-कॉमर्स वेबसाइट- फ्लिपकार्टशी आहे. फ्लिपकार्ट आपला सुपर सेव्हिंग डेज सेल 6 ऑगस्टपासून सुरू करणार असल्याची माहिती आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Amazon Great Freedom Festival 2022 will from 6 August check details 02 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News