22 May 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Health First | घरात बसून देखील हाडे कमकुवत होऊ शकतात | या सवयी बदला - वाचा सविस्तर

Weak Bones

मुंबई, ११ जून | बऱ्याच वेळा वयाच्या पूर्वीच माणूस म्हातारा होतो,त्याचे कारण आहे त्याची खराब जीवन शैली. बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला काहीच होणार नाहीं. परंतु आयुष्यात शिस्त नसेल तर कधी काय घडेल हे सांगू शकत नाही. बऱ्याच वेळा आपण अनारोग्यादायी जीवनशैली अवलंबवून रोगांना आमंत्रित करतो. आपल्या काही अशाच वाईट सवयी वेळेच्या पूर्वीच आपल्या हाडांना कमकुवत करू शकतात. घरात राहून देखील आपण आपले हाडे मजबूत करू शकतो.

हाडांच्या निर्मितीसाठी कोणत्याही व्यक्तीचे वय खूप महत्वाचे मानले जाते. आपण 30 वर्षांचे झाल्यावर आपली हाडे जवळजवळ पूर्ण विकसित झाली असतात. जर, हाडे मजबूत नसतील तर, हाडे नाजूक आणि कमकुवत होऊ शकतात. आज आपण अशा 5 सुपरफूड्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. हे सुपरफूड्स पौष्टिक आणि खनिज घटकांनी परिपूर्ण आहेत, जे आपली हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊ या.

1. व्यायाम आणि योग:
व्यायाम आणि योगाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा.या मुळे तनासह मनाची देखील मजबूती मिळेल.व्यायाम आणि योगा हे दोन्ही वेगळे आहे.व्यायाम केल्याने मेटॉबॉलिझ्म वाढतं,शारीरिक क्रिया होते.योगा केल्याने शरीरासह आपले मन आणि मेंदू देखील शांत होते.

2. मिठाला नको म्हणा:
बहुतेक लोकांना वरून मीठ घेण्याची सवय असते.किंवा अन्नात मीठ कमी असल्यावर ते वरून मीठ घेतात.सॅलड मध्ये देखील मीठ जास्त प्रमाणात घेतात. जर आपली देखील सवय अशीच आहे तर आजच ही सवय बदलून घ्या.या मुळे आपली हाडे गळू शकतात.

3. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम:
शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाड कमकुवत होऊ लागतात. आणि वेळेपूर्वीच सांध्यात वेदना सुरु होते.म्हणून न्याहारीत,जेवणात कॅल्शियमयुक्त पदार्थ खावे.सकाळी 8-9 पर्यंत सूर्यप्रकाश घ्या.असं केल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल.

4. धूम्रपान करू नका:
जर आपल्याला धूम्रपान करण्याची सवय आहे तर ही सवय आजच सोडा. धूम्रपान केल्याने हाडांसाठी बनलेल्या पेशी नष्ट होतात. यामुळे हाडे कमजोर होतात. यासह, हाडांशी संबंधित इतर समस्या देखील उद्भवू लागतात.

5. वजन कमी करणे:
आज च्या काळात लोकांना न जास्त लठ्ठ न जास्त बारीक राहणे आवडते.जर आपले वजन सामान्यांपेक्षा जास्त आहे तर वजन कमी करा.कमी असल्यास अजून कमी करू नये. असं केल्याने ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका वाढतो.

 

News Summary: Many times a person gets old before his age because of his bad lifestyle. Many people say that nothing will happen to us. But if there is no discipline in life, one cannot predict what will happen. Too often we invite disease by adopting an unhealthy lifestyle. Some of these bad habits can weaken your bones prematurely. Staying at home can also strengthen our bones.

News Title: Too much home rest can weaken the bones in human body health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x