29 April 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

7-12 Utara QR Code | गाव-खेड्यातील जमिनीच्या सात बारा'मध्ये हा बदल होणार, QR कोड 7-12 उतारा ते फेराफार असा डाउनलोड करा

Land Satbara Utara

7-12 Utara QR Code | जमिनीचे व्यवहार करताना सातबारा हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. सात बारा हा जमिनीची निगडित शब्द आहे. पण सात बारा प्रत्येकांना समजतो असे नाही. यामुळे सरकारने सात बारा सोपा करण्याचा विचार केला आहे. हा उतारा सर्वांना समजेल अशा भाषेत येणार असून त्यावर क्युआर कोडही असणार आहे. आधीच्या ठाकरे सरकारने हा महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला होता.

गाव नकाशा शेत जमीन गावठाण यांच्याशी निगडीत येणारा शब्द म्हणजे सातबारा आठ, ‘अ’ म्हणजेच फेरफार. गावाकडे या फेरफार शब्दाला फार मोठे स्थान आहे. एखाद्या जमिनीची नोंदणी, वारस नोंदणी, आकार, जमीन खरेदी विक्री,जमिनीवर बोजा चढवणे, जमिनीवर बोजा उतरवणे या संबंधित सरकारी कागद म्हणजेच जमिनीचा फेरफार. बराच वेळेस जमिनी खरेदी करताना फेरफार चेक केला जातो. यासाठी सरकारी कार्यालयांना हेलपाटे घालावे लागतात, अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतात. पण आता मात्र सरकारने खास तुमच्यासाठी घर बसल्या ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने महसूल विभागात बरेचसे कामे ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे. त्यापैकी हे सातबारा, आठ अ, हेसुद्धा आपण ऑनलाईन बघू शकतो.

कसा बघायचा ऑनलाईन?

* सातबारा ऑनलाइन पाहाण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल वर https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.

* या संकेत स्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे महसूल विभागाची वेबसाईट दिसेल. त्यानंतर आपली चावडी हा पर्याय तिथे उपलब्ध असेल, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिजिटल नोटीस बोर्ड नावाचे पेज उघडेल. त्या पेजवर तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि गावाचे नाव इंटर करायचे आहे.

* यानंतर तुमच्या गावातील सगळ्या फेरफार नोंदी तुम्हाला दिसतील. या फेरफार नंबर तुम्हाला दिसतील या फेरफार नंबर आले पुढील पहा हा पर्याय दाबल्यास एक पेज ओपन होऊन त्यामध्ये तुम्हाला गट नंबर, फेरफार चा प्रकार आणि तारीख दिसेल. यावरून आपण मोजणी सुद्धा मागू शकतो, किंवा दुसरी कोणी मागवली असेल ते सुद्धा आपल्याला कळू शकते.

News Title: Maharashtra State land Satbara Utara QR Code will get this changes check details on 23 February 2023.

हॅशटॅग्स

#BhulekhMahabhumi(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x