5 May 2024 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

हिमनद्यांवर विपरित परिणाम होतोय... तर १ अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होईल - IIT संशोधन

Indore IIT professor

नवी दिल्ली, १५ जून | हवामान बदलांमुळे हिमालयातील बर्फ अधिक वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळे विविध प्रकारचे धोके निर्माण होत आहेत. हिमनद्या वितळणं थांबल्यास तब्बल एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही धक्कादायक आता बाब समोर आली आहे. आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.

हिमालय-काराकोरमच्या ग्लेशिओ-हायड्रोलॉजी” च्या नवीन संशोधनानुसार, हिमनद्यांवर होणाऱ्या विपरित परिणामामुळे हिमनद्यांवर अवलंबून असलेल्या भारतासह शेजारच्या देशांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आजम म्हणाले. विशेष म्हणजे हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांमधून वितरित होणाऱ्या हिमनद्यांमुळं सुमारे तब्बल एक अब्जाहून अधिक लोकांना पाणी मिळतं.

हवामान बदलामुळे या शतकात बहुतेक हिमनग वितळून जातील आणि पाणीपुरवठा खंडित होईल, तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळणार नाही. हिमनगांमधून वितळणारं पाणी आणि हिमनद्यांवरील हवामान बदलाचे परिणाम सिंधू खोऱ्यात लक्षणीयरित्या जाणवत आहे असंही म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Indore IIT professor says one billion peoples will not get water if Himalayan glaciers stopped news updates.

हॅशटॅग्स

#Environment(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x