मुंबई, १५ जून | यात काहीच शंका नाही की मिठाशिवाय अन्न एकदम बेचव लागते पण तुम्ही कधी विचार केला आहे का जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे काय होते? WHOच्या नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातअसे दिसून आले आहे की जास्त प्रमाणात मीठ खाल्याने दरवर्षी ३ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. आता ही संख्या कमी करण्यासाठी संस्थेने लोकांना दिवसातून फक्त 5 ग्रॅम मीठ खाण्यास सांगितले आहे. यासह अन्न वातावरण सुधारण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी 60 पेक्षा जास्त खाद्य श्रेणींमध्ये सोडियमच्या पातळीसाठी नवीन मानकं तयार केली गेली आहेत.
मीठ म्हणजे अगदी स्वस्त असा समज असेल तर तो प्रथम दूर करायला हवा. जगात असेही एक प्रकारचे मीठ आहे जे खरेदी करायचे ठरविले तर सर्वसामान्य माणसाला कर्ज घ्यावे लागेल. तरीही हे महागडे मीठ अनेक प्रसिद्ध शेफची प्रथम पसंती आहे.
आइसलँडिक सॉल्ट या नावाने ते प्रसिद्ध असून हे मीठ १ किलोसाठी ८० लाख ३० हजार रुपयांना मिळते. हे मीठ म्हणजे लग्झरी आयटम असून हे मीठ बनविणारी कंपनी काही वर्षापूर्वी स्थापन झाली आहे. मात्र येथे मीठ बनते ते २०० वर्षाच्या परंपरागत पद्धतीने. विशेष म्हणजे ही सर्व प्रोसिजर हाताने केली जाते. आइसलँडच्या उत्तर पश्चिम भागात मिठाच्या कारखान्यात ते बनते. हा कारखाना पहाडी भागात आहे. वर्षातील अनेक महिने प्रचंड हिमपातामुळे हा रस्ता बंद असायचा पण आता बोगदा तयार केला आहे. त्यामुळे १९९६ पासून येथे स्थिती बरी आहे असे सांगितले जाते.
दरवर्षी येथे १० मेट्रिक टन मिठाचे उत्पादन होते. समुद्रातील पाणी पाईप द्वारे आणून ते प्रथम उकळावे लागते. पाणी तापविणे, उकळविणे, आणि मिठाचे क्रिस्टल तयार झाल्यावर ते वाळविणे अशी सर्व कामे हाताने केली जातात. फिकट रंगाचे हे मीठ आज चार स्वादात उपलब्ध आहे. अनेक श्रीमंत घरातून आणि रेस्टोरेंटमधून या मिठाला मागणी आहे. हे मीठ गिफ्ट बॉक्स मधून गिफ्ट म्हणून सुद्धा एकमेकांना दिले जाते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: World’s most costly salt health news updates.
