11 December 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कोरोना लसीकरण | गैरसमज पसरत आहेत | घाबरू नका, सत्य समजून घ्या

Corona virus, Pfizer vaccine, British woman

लंडन, १० डिसेंबर: सुरुवातीला म्हणजे चीनच्या हुवानं शहरातून कोरोना जगभरात पसरायला सुरुवात झाल्याच्या वृत्तानंतर अनेक गैरसमज देखील पसरण्यास सुरुवात झाली होती आणि परिणामी लोकांमध्ये जनजागृती होण्या ऐवजी भीती निर्माण झाली. आता कोरोना लसीकरण सुरु झाल्यनंतर देखील विनाकारण गैरसमज पसरवले जातं आहेत आणि त्यामुळे चिंता वाढू शकते. मात्र मिळलेल्या अधिकृत माहितीनुसार घाबरण्याचं आणि चिंता करण्यासारखं काहीच नाही हे समजून घेणं गरजेचं आहे.

कोरोना ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या करोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटीश नियामक प्राधिकरणाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. लस घेतलेल्या दोघांची प्रकृती बिघडल्यानंतर प्रशासनाने निर्देश जारी केले असून एलर्जी असलेल्या लोकांनी लस न घेण्याचे आवाहन केले आहे.

ब्रिटनमध्ये फायझरची कोरोनाची लस दिल्यानंतर दोन लोकांची तब्येत बिघडली आहे. ही बाब ब्रिटनने अत्यंत गंभीरपणे घेतली असून कोरोना लस कुणी घ्यावी आणि कुणी घेऊ नये, याबाबतच्या सूचना ब्रिटीश प्रशासनाने जारी केल्या आहेत. ज्यांना गंभीर अॅलर्जीची समस्या आहे. त्यांनी सध्या तरी कोरोनाची लस टोचून घेऊ नये. ज्या लोकांना औषधं, अन्न किंवा लसीची अॅलर्जी आहे त्यांनी फायझरची लस घेऊ नये, असं आवाहन ब्रिटनच्या आरोग्य विभागाने केलं आहे.

ब्रिटनमध्ये मंगळवारपासून करोना लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त दोघांचीच प्रकृती बिघडली असल्याचे समोर आले आहे. लस सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच फायजरच्या लशीला मंजुरी दिली असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य विभागाने सांगितले. आतापर्यंत दोघांनाच लसीमुळे त्रास झाला असून इतरांना कोणताही त्रास झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाला अॅलर्जी होईलच असं नाही:
कोरोना लसीची ट्रायल करताना औषधांची अॅलर्जी असलेल्या कोणत्याही व्यक्तिचा लसीकरणात समावेश करण्यात आलेला नव्हता, असं फायझर बायोटेकने (Pfizer-BioNTech) म्हटलं आहे. या व्हॅक्सीनमुळे प्रत्येकालाच अॅलर्जी होईल, यात काही तथ्य नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कोंबडीचे अंडे, लस आणि अॅलर्जी:
लोक जेलाटीन किंवा एग्ज प्रोटीन किंवा या व्हॅक्सीनबाबत संवेदनशील असू शकतात. ज्या लोकांना अंड्यांची अॅलर्जी आहे, त्यांना व्हॅक्सीन न घेण्याची डॉक्टरांनी सूचना केलेली असेल तर त्यांनी तसं लस घेण्यापूर्वी स्पष्ट केलं पाहिजे. कारण कोरोनाची व्हॅक्सीन बनविण्यासाठी कोंबडीच्या अंड्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही व्हॅक्सीन घेतल्यानंतर अंड्यांची अॅलर्जी असलेल्यांमध्ये अॅलर्जी होऊ शकते. कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांच्या अंगावर व्रण उमटू शकतात, त्वचेला जळजळ होऊ शकते, खोकला वाढू शकतो आणि श्वास घेण्यास त्रासही होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अशी अॅलर्जी जाणवतेय का?
लस घेतल्यानंतर खांद्यावर किंवा जिथे लस टोचून घेतली तिथे दुखू शकतं, ताप येऊ शकतो, अंगात कणकणी जाणवू शकते, असंही तज्ज्ञांनी सांगितलं. ज्या लोकांवर व्हॅक्सीनचा प्रयोग करण्यात आला त्यांना थकवा, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आदी त्रास होत असल्याचं फायझरच्या अभ्यासातून आढळून आलं होतं. मात्र, कुणाला अॅलर्जी झाल्याचं दिसून आलं नव्हतं. त्यामुळे अॅलर्जी होणं हे अनपेक्षित असून ही अॅलर्जी फार कमी वेळ राहणारी आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आणखी लक्षणे जाणवतात का?, संशोधन सुरू
कोरोना लस घेतल्यानंतर रुग्णांना अजून गंभीर लक्षण जाणवत आहेत का? यावर संशोधन सुरू आहे. मात्र त्यासाठी थोडा अवधी जाणार आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, बुजुर्ग लोकांना व्हॅक्सीन दिली जात आहे. त्यानंतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनाही ही लस दिली जात आहे. भारतातही अर्धा डझन व्हॅक्सीनची ट्रायल सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे.

 

News English Summary: In Britain, two people have fallen ill after being vaccinated with Pfizer’s corona. The UK has taken this matter very seriously and the British administration has issued instructions on who should and should not take the corona vaccine. Who have severe allergy problems. They should not be vaccinated against corona at present. People who are allergic to drugs, food or vaccines should not take the Pfizer vaccine, the UK Department of Health has appealed.

News English Title: Corona virus Pfizer vaccine 90 years old British woman is first in world to get Pfizer vaccine news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x