5 May 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

एक ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल असणारी ‘अ‍ॅपल’ जगातील पहिली कंपनी बनली आहे

न्यूयॉर्क : आयफोन बनविणारी कंपनी ‘अ‍ॅपल’ एक ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल असणारी जगातील पहिली कंपनी बनली आहे. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा जागतिक दर्जाचा मान प्राप्त केला आहे. अ‍ॅपल’नंतर बाजार भांडवलाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो तो अ‍ॅमेझॉनचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गुगलची ‘अल्फाबेट’ कंपनी आणि या तिन्ही कंपन्या अमेरिकन आहेत.

शेअर बाजारात आलेल्या तेजीने ‘अ‍ॅपल’चे शेअर २०७.०५ अमेरिकी डॉलर या आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चस्तरावर पोहोचले आणि हा अर्थव्यवस्थेतला विक्रम घडला आहे. कंपनीने तिमाहीचे परिमाण सार्वजनिक करताना सप्टेंबरमध्ये कंपनी आयफोनपेक्षा महाग फोन बाजारपेठेत आणणार आहे अशी घोषणा केली होती. त्यानंतर शेअर बाजारात तेजी येऊन कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली होती.

वास्तविक १९९७ मध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणारी कंपनी या उच्चांकावर येऊन पोहोचली असती तरी त्यामागे सीईओ स्टिव्ह जॉब्स यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांनीच आयपॉड आणि आयफोनसारखे उत्पादने आणून ‘अ‍ॅपल’ला एका नव्या जागतिक उंचीवर नेले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x