5 May 2025 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Health First | हृदयविकाराचा झटका आल्यास ‘हे’ उपाय करा आणि जीव वाचवा | वाचा आणि शेअर करा

First aid heart attack

मुंबई, २० जून | एका संशोधनादरम्यानच्या सर्व आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, यात तरुण मंडळींचाही समावेश आहे. वास्तविक, बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची सुरुवातीची लक्षणे समजत नाहीत आणि रूग्णालयात नेईपर्यंत जीव वाचवण्याइतके प्राथमिक उपचार त्यांना मिळत नाहीत. यामुळे, बर्‍याच वेळा रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर बनते आणि कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या कुटूंबाला कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आणि प्रथमोपचार संबंधित आवश्यक माहिती जाणून घेतलीच पाहिजे.

‘ही’ असू शकतात लक्षणे:
छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना, छातीत दुखणे, हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणे, घाम येणे, चक्कर येणे किंवा चिंताग्रस्त होणे, श्वास लागणे, मळमळणे आणि खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. मात्र कधीकधी वेदना खूपच जोरात होतात, तर कधीकधी सौम्य असतात किंवा जाणवतच नाहीत. परंतु, इतर लक्षणांसह आपण त्याचा आधीच अंदाज लावू शकता

हृदयविकाराचा झटका जर कुणाला आला तर अजिबात घाबरून न जाता हे पाच उपाय जर केले तर तुम्ही रुग्णाचा जीव वाचू शकता. महत्वाची गोष्टी म्हणजे रुग्णवाहिका ताबडतोब बोलवा. बहुतांश रुग्णवाहिकांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध राहत असल्यामुळे रुग्णावर ताबडतोब उपचार सुरू केले जाऊ शकतात.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळते. त्या रुग्णाला अशावेळेस एका कडेवर वळवा. त्याला असे केल्याने मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तिव्रता कमी होते. तसेच फुप्फुसांना नुकसान होत नाही. मानेजवळ रुग्णाच्या हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. तो जर 60 ते 70 पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतो आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असे समजून तात्काळ रुग्णालयात हलवा.

कमी जास्त पल्स रेट होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. यामुळे पायाकडील रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असे केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो. रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसेच जिने चढणे-उतरणे टाळावे. असे काही घडत असेल तर रुग्णाभोवती जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. पुरेशी हवा त्याला मिळेल नीट श्वास घेता येईल येची काळजी घ्या. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट यापैकी कोणतिही एक गोळी रुग्णाला द्यावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: First aid treatment for saving life during heart attack health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या