20 April 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

महाराष्ट्रात आणीबाणी २.० | भाजपाकडून महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टरबाजी

Emergency poster, Outside Maharashtra Sadan, BJP Leader Tajinder Bagga

दिल्ली, ०५, नोव्हेंबर: Republic TV वृत्त वाहिनेचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात काल सकाळी त्यांच्या निवास्थानावरून अटक करण्यात आली आहे. दरम्यान या अटकेच्या कारवाईची तुलना भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधी यांच्या काळातील म्हणजे १९७५च्या आणीबाणीशी केली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने हाच मुद्दा देशाच्या राजधानीत महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या महाराष्ट्र सदनाबाहेर देखील प्रदर्शनाला मांडला आहे.

कारण भारतीय जनता पक्षाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर आणीबाणी २.० चा पोस्टर लावून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची तुलना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीशी केली आहे.

दरम्यान, वास्तुविषारद असलेले अन्वय नाईक यांनी अलिबाग येथे २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल (४ नोव्हेंबर)ला ताब्यात घेण्यात आलं. रायगड पोलिसांनी केलेल्या या अटकेवरून भारतीय जनता पक्षाकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड तीव्र करण्यात येतं आहे. तत्पूर्वी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या घटनेची तुलना आणीबाणीशी केली आहे.

 

News English Summary: Arnab Goswami, editor-in-chief of the Republic TV news channel, was arrested from his residence yesterday morning in connection with the Naik suicide case. Meanwhile, the BJP has compared the arrests to the Indira Gandhi-era Emergency of 1975. However, the Bharatiya Janata Party has raised the same issue outside the Maharashtra Sadan, which is the capital of the country. This is because BJP leader Tejinderpal Singh Bagga has put up a poster of Emergency 2.0 directly outside the Maharashtra House in Delhi, comparing the Thackeray government in Maharashtra to the Emergency under former Prime Minister Indira Gandhi.

News English Title: Emergency poster Outside Maharashtra Sadan by BJP Leader Tajinder Bagga News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x