7 May 2024 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

तरुणांसाठी दुग्ध व्यवसाय आहे एक मोठी संधी | वाचा सविस्तर माहिती

Milk business

मुंबई, १९ जून | ग्रामीण भागाचे चित्र बदलण्याची क्षमता दूध व्यवसायात आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या आहारात दुधाचे स्थान महत्त्वाचे असल्याने दुधाला सातत्याने मोठी मागणी असते. उच्च गुणवत्ता हा या क्षेत्राचा पाया आहे. हे लक्षात घेऊन काम करणाऱ्या तरुणांना दूध व्यवसायात अमाप संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन दूध उद्योजक तथा नाशिक डिस्ट्रिक्ट प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षांनी केले होते.

समाजाची आर्थिक स्थिती जशी जशी सुधारत जाते तशा त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत जातात. दूध, अंडी, मांस, भाज्या, फळे आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ यांची मागणी वाढत जाते. त्यातले दुधाची मागणी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्हींकडून वाढते. त्या प्रमाणात देशात दुग्धोत्पादन वाढले पाहिजे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समाजात डेअरी टेक्नालॉजी वाढली पाहिजे. भारतात ती वाढत आहे आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही लागत आहे. ही गरज ओळखून अनेक विद्यापीठांनी डेअरी टेक्नालॉजीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

मात्र या क्षेत्राला किती महत्त्व येत आहे याची योग्य जाणीव समाजात वाढत नसल्याने या अभ्यासक्रमांकडे लोकांचा ओढा दिसत नाही. दुधाचे शास्त्र वेगळे आहे. मुळात लोकांना दूध लागते ते चहासाठी. फार तर काही लोक दूध पीत असतील. दुधाच्या अशा वापराला मर्यादा आहेत. पण दूध जादा तयार होत असेल तर ते या मर्यादांमुळे खपणे अवघड जाईल. तेच दूध ताक, दही, लस्सी, श्रीखंड, आइसस्क्रीम या सारख्या पदार्थांच्या रूपात त्यांना दिले तर ते खपेल. म्हणून डेअरी टेक्नालॉजीत तीन गोष्टींना महत्त्व असते. पहिले म्हणजे दुधाचे उत्पादन वाढवणे, दुसरे म्हणजे प्रक्रिया करणे आणि तिसरे म्हणजे विकणे. या तीन अंगांचा अभ्यास या अभ्यासक्रमांत असतो. बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांस प्रवेश घेता येईल. डेअरी टेक्नालॉजीचे पदविका अभ्यासक्रम तर आहेतच पण पदवी आणि पदव्युत्तर वर्गही आहेत.

आपल्या नजिकच्या कृषि विद्यापीठांशी संपर्क साधल्यास पशु वैद्यकीय महाविद्यालयांचे पत्ते मिळतील. काही विद्यापीठांत याच महाविद्यालयांत डेअरी टेक्नालॉजीचेही शिक्षण दिले जाते. काही विद्यापीठांत स्वतंत्रपणे शिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी अनेक आहेत. दुग्ध व्यवसाय करणार्‍या संस्थांत तर रोजगार मिळतोच पण प्रक्रिया उद्योगात प्राधान्याने नोकरी मिळते. आइसस्क्रीमच्या कारखान्यांतही नोकरी उपलब्ध होऊ शकते. नोकर्‍यांना तोटा नाही. कारण संधी भरपूर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ कमी अशी स्थिती आहे.

संपर्कासाठी महाराष्ट्र ऍनिमल अँड फिशरी सायन्सेसयुनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील वरूड येथील कॉलेज ऑफ डेअरी टेक्नालॉजी या महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Milk business is the big opportunity sector for youngsters news updates.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x