19 May 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

सावधान | देशातील डेल्टा प्लसच्या एकूण 22 प्रकरणांपैकी 16 जळगाव, रत्नागिरीत | तिसऱ्या लाटेचा धोका वाढतोय

Delta variant of coronavirus

मुंबई, २३ जून | कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा व्हेरिएंटने भारतासह जगात चिंता वाढवली आहे. भारत आणि अमेरिकेतील तज्ज्ञांनी तर 24 तासात या नवीन व्हेरिएंटवर इशारा दिला आहे. भारतात हाच डेल्टा प्लस व्हेरिएंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरू शकतो. अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध महामारी तज्ज्ञ अँथनी फौची याची देखील अशाच स्वरुपाचा इशारा दिला आहे. फौची यांच्या मते, अमेरिकेत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डेल्टा व्हेरिएंट सर्वात घातक आहे. डेल्टाच्या मूळ व्हेरिएंटच्या तुलनेत ओरिजिनल नवीन व्हेरिएंट झपाट्याने फैलावतो. या व्हेरिएंटमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते.

लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज:
फौची पुढे म्हणाले की फायजरसह अनेक कंपन्यांचे व्हॅक्सीन अमेरिकेत दिले जात असून त्या सर्वच व्हेरिएंटवर प्रभावी आहेत. आपल्याकडे संक्रमण थांबवण्यासाठी व्हॅक्सीनेशन ही पद्धत आहे, त्याचा वापरही करायला हवा. अर्थातच लसीकरणाचे लक्ष्य लवकरात लवकर साध्य करावे. अमेरिका सरकारचे वरिष्ठ सल्लागार जेफरी जेंट्स यांनी सांगितले, की 4 जुलै पर्यंत 70% युवा जनतेच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण, त्या लक्ष्यापासून आपण दूर आहोत. याला आणखी काही आठवडे लागू शकतात.

डेल्टा प्लसच्या एकूण 22 प्रकरणांपैकी 16 एकट्या महाराष्ट्रात:
भारतात तिसऱ्या लाटेसाठी डेल्टा प्लस व्हेरिएंट जबाबदार ठरू शकतो. तज्ज्ञांनी हा धोका लक्षात घेता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारीच सांगितले, की जगातील 9 देशांमध्ये हा व्हेरिएंट आहे. भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटने कोरोना झाल्याची 22 प्रकरणे समोर आली आहेत. यातील सर्वाधिक 16 प्रकरणे रत्नागिरी आणि जळगाव येथून आहेत. उर्वरीत प्रकरणे केरळ आणि मध्य प्रदेशात नोंदवण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Delta variant of coronavirus is greatest threat in India and Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x