12 May 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
x

नियमांचं उल्लंघन | केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना ट्विटने तासभर लॉगइन करण्यापासून रोखलं

Twitter

नवी दिल्ली, २५ जून | केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वादाचा पुन्हा एक नवा अंक आज समोर आला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटवर आपल्याला लॉगइन करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. जवळजवळ तासभर आपल्याला लॉगइन करुन देण्यात आलं नाही. यासाठी अमेरिकेतील कॉपीराईट कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं मला सांगण्यात आल्याचं रवि शंकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय.

रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. “मित्रांनो आज माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. ट्विटरने मला माझ्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस जवळजवळ तासभर दिला नव्हता. मी अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केल्याचं मला सांगण्यात आलं आणि नंतर मात्र मला त्यांनी अ‍ॅक्सेस दिला,” असं पहिल्या ट्विटमध्ये रवि शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी, “ट्विटरची ही करावाई म्हणजे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र नियम) २०२१ मधील नियम ४(८) चे उल्लंघन आहे. त्यांनी (ट्विटरने) मला माझ्या अकाऊंटला अ‍ॅक्सेस नाकारण्याआधी सूचना दिली नव्हती,” असं म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Union IT Minister Ravi Shankar Prasad Says Twitter Denied Access To My Account news updates.

हॅशटॅग्स

#Twi(1)#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x