11 May 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे
x

नाबार्ड दक्षता पथकाच्या चौकशीत मुंबै बँकतील बोगस कर्ज प्रकरणं समोर | दरेकरांच्या अडचणीत वाढ

BJP leader Pravin Darekar

मुंबई, २८ जून | मुंबै बँकमध्ये बोगस कर्ज प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे. नाबार्डच्या आदेशावरून बॅंकेच्या दक्षता पथकाच्या चौकशीत समोर बोगस कर्जाचं प्रकरण समोर आल्याचं बोललं जातं आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे सर्व राजकारण असून सत्ताधाऱ्यांकडून द्वेषापोटी हे सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबै बॅंकच्या कार्यपद्धतीवर आणि कर्ज देण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. मुबै बँकेच्या ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर, अंधेरी पूर्व आदी शाखांमध्ये बनावट कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून कोट्यवधींचा अपहार होत असल्याची तक्रार एका सभासदाने थेट नाबार्डकडे केली होती. त्यानंतर बँकेच्या दक्षता पथकाने केलेल्या तपासणीतून काही कर्ज प्रकरण बोगस आढळून आली आहेत. बँकेशी संबंधित काही मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणत्याही प्रकरणात कर्जव्यवहाराचे करारपत्र न करताच, पात्रतेपेक्षा अधिक कर्ज मंजूर केल्याचं अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा या प्रकरणावर भाष्य केले आहे. जसे इतरांना चौकशीला सामोरे जा, असं दरेकर म्हणतात. त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा या चौकशीला सामोरं जावं, असं मत थोरात यांनी मांडलं आहे. प्रवीण दरेकर यांनी या संदर्भातील सर्व आरोप फेटाळत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणी राजकारण होत आहे. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी एकवेळा नाही तर 100 वेळा तयार आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: State Vidhan Parishad opposition leader Pravin Darekar denies allegations on MDCB bank news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x