19 April 2024 8:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

राज्यात नवी समीकरणे जुळत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले: शिवसेना

Saamana Editorial, Uddhav Thackeray, Shivsena, BJP, Devendra Fadnvavis

मुंबई: ‘सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आमचेच सरकार येणार’ असं कोणत्या तोंडानं सांगत आहेत’, असा खडा सवाल करतानाच, ‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,’ असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू होताच आता सरकार फक्त आमचेच बरे का! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीच्या आड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. पुन्हा आमचेच सरकार अशा किंकाळ्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाटत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल का? याची आम्हाला चिंता वाटत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर कडाडून टीका करण्यात आली आहे.

शिवसेना सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे सांगते आहे. यावर वेट अँड वॉचची भूमिका घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने आता सरकार भारतीय जनता पक्षाचेच येणार, असा दावा केला आहे. त्यावर शिवसेनेने कडाडून टीका केली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या आडून घोडेबाजार भरवण्याचे भारतीय जनता पक्षाचे मनसुबे असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. कोण कसे सरकार बनवतो तेच पाहतो अशा प्रकारची अप्रत्यक्ष भाषा व कृती सुरू झाली आहे. सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू असे शाप दिले जात आहेत. ६ महिन्यांच्या वर सरकार टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो. स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत.

महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था १०५ वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल”, असे म्हणत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर जहरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाव न घेता समाचार घेतला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x