मुंबई: महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला.

काँग्रेस आणि आमचे विचार वेगळे असले म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आमचे राजकीय राजकीय मतभेद आहेत. ते कोणाचे नसतात. आम्ही अनेकदा भाजपाच्या विरोधातही मुद्दे मांडले. त्यामुळे ते आमचे शत्रू आहेत असं नाही अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या भल्यासाठी प्रत्येकांनी प्रत्यन्त केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे चांगले नेते होते आणि आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना पहिली संधी मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. भाजपाने यापूर्वी स्पष्ट बहुमत नसतानाही अनेक राज्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी दावा केलेला होता, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच गेल्या १५ दिवसांत भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्यामुळे राज्यात सरकार स्थापनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. राज्यपालांच्या पुढाकारानेच आता राज्याला नवे सरकार मिळू शकते. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला संधी दिली आहे, त्यांनी याला लाभ घेतला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने बहुमत सिद्ध करून दाखवावं, असे थेट आव्हानही राऊत यांनी दिले आहे.

भारतीय जनता पक्षाचा भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला. कुणाचेही आमदार फुटणार नसल्याचं ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार सध्या मुंबईतील मालाडमधील हॉटेल रिट्रीटमध्ये आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री सर्व आमदारांशी चर्चा केली आणि हॉटेलमध्येच मुक्कामही केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आमदारांना भेटण्याची शक्यता आहे.

काँग्रेस सेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता; दोन्ही बाजूंनी अप्रत्यक्ष वक्तव्य