20 June 2021 8:50 PM
अँप डाउनलोड

आम्ही सारखं 'मी पुन्हा येईन पुन्हा येईन' बोलणार नाही; शिवसेनाच येणार: संजय राऊत

Shivsena, BJP, MP Sanjay Raut

मुंबई: ‘नव्या सरकारच्या फॉर्म्युल्याची चिंता करू नका. त्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. लाख प्रयत्न करा, कुणीही शिवसेनेला रोखू शकणार नाही,’ असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज बोलून दाखवला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिवसेनेचे नेते संजय राऊत आज, १५ नोव्हेंबर रोजी ५८ वा वाढदिवस साजरा करत असून आजही त्यांनी सकाळीच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा पुनरुच्चार केला. दरम्यान, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही कायम सत्तेत राहू, ये-जा करणार नाही, असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

“महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावं लागणार आहे. तुम्ही पुढील पाच वर्ष काय घेऊन बसलात. पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आम्ही सारख मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,” असं म्हणाणार नाही. “तसंच ये-जादेखील करणार नाही. कायम सत्तेत राहू,”” असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.sanjay

त्याचसोबत विभिन्न विचारधारा काय असते? किमान समान कार्यक्रम राज्याच्या हितासाठीच आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींनी पहिलं सरकार विविध विचारधारेची माणसं येऊन बनलं होतं. शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात यापूर्वीही किमान समान कार्यक्रम ठरवून विभिन्न विचारधारेची लोकांना एकत्र येत सरकार बनविले होतं. शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्र येत असतील त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे असं सांगत संजय राऊतांनी देशात असं सरकार यापूर्वीही बनलं आहे अशी आठवण करुन दिली. दरम्यान, राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल, चिंता नको असा दावा भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्ष आमदारांच्या बैठकीत केला आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(221)#Shivsena(1097)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x