3 May 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

कोरोना काळातील आंदोलन ही दुर्दैवाची गोष्ट | राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी परिस्थितीचा थोडा विचार करायला हवा

D B Patil Navi Mumbai Airport

मुंबई, ३० जून | कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नसताना आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टमुले तिसऱ्या लाटेचा धोका असताना राज्यात अनेक आंदोलनं झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून न्यायिक प्रक्रियेपेक्षा भाजप नेत्यांना सामान्य लोकांना भडकविण्याचा प्रयन्त केल्याचं आणि आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या विमानतळाच्या मुद्यावरून सर्व पक्षाच्या नेत्यांनी देखील आंदोलन केलं होतं.

दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन करण्यात आलेल्या आंदोलनावर मुंबई हायकोर्टाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. कोरोनाच्या काळात लोक आंदोलन करतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विमानतळ अजून तयार झाले आहे का? लोकांना जराही धीर नाही, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

नवी मुंबईच्या आंदोलनात 25 हजारांच्या आसपास लोकांची गर्दी झाली होती. या मुद्याचं राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी परिस्थितीचा थोडा विचार करायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले.

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. त्यासाठी 24 जूनला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडकोला घेराव घातला होता. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Navi Mumbai airport naming controversy in Mumbai High Court news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x