13 May 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Health First | रोज सकाळी रिकाम्या पोटी करा कच्चे लसूण आणि मधाचे सेवन | हे आरोग्यदायी फायदे होतील

Raw garlic with honey benefits

मुंबई, ३० जून | सामान्यतः प्रत्येक घरात मध आणि लसूण वापरली जाते आणि या दोन्हीच्या फायद्यांविषयी आपल्याला चांगलीच माहिती आहे. मात्र जर याचे सेवन एकत्र केले गेले तर याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. मधात भरपूर प्रमाणात जीवाणूरोधक गुण आढळून येतात तर दुसरीकडे लसणीत एलिसिन आणि तंतूमय पदार्थांची मात्रा मोठी असते. या दोन्ही पदार्थांमुळे अनेक आजार आणि रोगांपासून आपला बचाव होण्यास मदत होऊ शकते.

* रोगप्रतिकारशक्ती करते मजबूत:
मधात बुडवलेली लसूण खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकता. हे एक सूपर फूड आहे जे अँटीबायोटिकसारखे काम करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास तसेच कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून आपल्याला सुरक्षित ठेवते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

* वजन कमी करण्यासही करते मदत:
लसूण आणि मधाचे एकत्र सेवन केल्याने आपली पाचनशक्ती अधिक वेगाने काम करते. यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होते.

* सर्दी खोकल्यासारखे सामान्य आजार होतात बरे:
सर्दी किंवा खोकल्याच्या सामान्य समस्या बऱ्या करण्यास मध आणि लसूण मदत करते. या दोन्हीत असे गुण असतात जे आपल्या शरीराला गरम करण्यात सहाय्य करतात.

* घशाची खवखव करतात कमी यातले गुण:
मध आणि लसणेत अँटीइन्फ्लेमेटरी गुण असतात. यामुळे घशाची खवखव, घशाला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

* हृदय निरोगी ठेवण्यात गुणकारी:
या दोन्ही पदार्थांमध्ये असे गुण असतात जे हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा झालेले फॅट काढण्यास मदत करतात. यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते.

* पाचनशक्ती सुधारून आपल्याला ठेवते फिट:
लसूण आणि मध हे एकत्र अशी तत्त्वे तयार करतात जी आपल्या पाचनयंत्रणेला निरोगी करतात. यामुळे आपल्याला डायरिया, पोटदुखी अशा समस्या उद्भवण्याचे प्रमाण कमी होते.

* कॉलेस्ट्रॉल करते कमी:
लसूण आणि मधाचे मिश्रण आपल्या शरीरातील विषारी पदार्थांसोबतच वाईट कॉलेस्ट्रॉलही बाहेर काढतात ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

* दात ठेवते उत्तम:
लसूण आणि मधामध्ये फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. यामुळे आपले दात निरोगी राहण्यास मदत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Raw garlic with honey every morning on empty stomach get healthy benefits news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x