मुंबई, ०१ जुलै | साईबाबा ही कलियुगातील अशी देवता आहे, जी कोणताही धर्म वा जात यांच्या बंधनात नाहीत. हिंदू, मुस्लिम वा शीख साईंचा दरबार प्रत्येक भक्तांसाठी सदैव खुला आहे. जर तुमचा साईंवर विश्वास असेल तर तुमच्या जीवनाची नौका ते स्वतः पार करतील. तसं तर साईबाबा एवढे कृपाळू आहेत की, भक्तांच्या एका नमस्कारानेही ते प्रसन्न होतात. पण तरीही साईंबाबांची विशेष कृपा त्यांच्यावरच होते जे नेहमी सत्याचं पालन करतात. जर तुमच्या आयुष्यात काही चिंता असतील तर साईंची ही 11 वचन तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. कोणतंही काम सुरू करण्याआधी साईंची ही 11 वचनं मनापासून स्मरण करा आणि मग बघा अडलेली कामं ही लगेच होतील.

1 – पहिलं वचन:
शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती आपाय सर्व त्याचे । ।।१।।

याचा अर्थ असा आहे की, जो भक्त साईबाबांची नगरी शिर्डीला येईल, त्याच्या सर्व चिंता दूर होतील. जर कोणी भक्त शिर्डीला येण्यास असमर्थ असेल तर त्याने मनापासून येथे येण्याची केलेली ईच्छासुद्धा उपस्थिती लावल्यासारखी आहे.

2 – दूसरं वचन:
माझ्या समाधीची पायरी जो चढेल । दुःखं हे हरेल सर्व त्याचे । ।।२।।
याचा अर्थ आहे की, साईबाबांच्या समाधीच्या पायऱ्यावर पाय ठेवताच भक्तांची सर्व दुःख दूर होतील.

3 – तिसरं वचन:
जरी हे शरीर गेलो मी टाकून । तरी मी धावेन भक्तासाठी । ।।३।।
अर्थात साईबाबा भलेही वर्तमानकाळात शरीर रूपाने उपस्थित नाहीत पण जर कोणी भक्त संकटात असेल तर साईबाबा त्याची मदत नक्कीच करतील.

4 – चौथं वचन:
नवसास माझी पावेल समाधी । धरा दृढ बुध्दी माझ्या ठायी । ।।४।।
याचा अर्थ असा आहे की, साई नाहीत म्हणून असं होऊ शकतं की, भक्ताचा विश्वास कमी होईल. त्याला एकटं आणि असहाय्य वाटू लागेल. पण भक्तांनी विश्वास ठेवावा की, साईंच्या समाधीमार्फत भक्तांची प्रत्येक प्रार्थना पूर्ण होईल.

5 – पाचवं वचन:
नित्य मी जिवंत जाणा हेचि सत्य । नित्य घ्या प्रचिती अनुभवे । ।।५।।
साई म्हणतात की, शरीर नश्वर असतं पण आत्मा अजर-अमर असते. म्हणूनच भक्तांमध्ये मी नेहमीच मी जीवंत असेन. ही गोष्ट भक्ती आणि प्रेमाने कोणताही भक्त अनुभवू शकतो.

6 – सहावं वचन:
शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी । ।।६।।

अर्थात जो कोणी भक्त खऱ्या श्रद्धेने साईंच्या शरणी येईल. त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल.

7 – सातवं वचन:
जो जो मज भजेल जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी । ।।७।।
साई म्हणतात की, ज्या व्यक्तीच्या मनात जसा भाव असेल तसं माझं रूप त्याला दिसेल. भक्त ज्या भावाने माझी कामना करतात, त्याच भावाने मी त्यांची कामना पूर्ण करतो.

8 – आठवं वचन:
तुमचा मी भार वाहिन सर्वथा । नव्हे हे अन्यथा वचन माझे । ।।८।।
म्हणजेच जो भक्त साईंच्या शरणात एकदा येतो त्याचे दायित्व, त्याचे जीवन सर्व साईंच्या हवाली होतं. तो भक्त चिंतेतून मुक्त होऊन स्वच्छंद पक्ष्यांप्रमाणे विहार करू शकतो.

9 – नववं वचन:
जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस । मागे जे जे त्यास ते ते लाभे । ।।९।।
साई म्हणतात की, जो भक्त श्रद्धा भावनेने माझी सहाय्यता मागतो त्याची मी सहाय्यता नक्कीच करीन. मी कधीच त्याला निराश करणार नाही.

10 – दहावं वचन:
माजा जो जाहला काया वाचा मनी । तयाचा ऋृणी मी सर्व काळी । ।।१०।।
जो भक्त मन, वचन आणि कर्माने साईंना लीन होतो, साई नेहमीच त्याचे ऋणी राहतात. त्या भक्ताच्या जीवनाची पूर्ण जवाबदारी साईंची होऊन जाते.

11 – अकरावं वचन:
साईं म्हणें तोचि, तोचि झाला धन्य।। झाला जो अनन्य माझ्या पायी।।11।।
साईबाबा सांगतात की, तो भक्त धन्य आहे जो अनन्य भावाने मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करतो. माझ्या दृष्टीने जो जीवनाकडे बघतो. जो संकटाला घाबरून मृत्यूला नाहीतर मला निवडतो. अशा भक्तांसाठी माझ्या मनात अपार प्रेम आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:

तुमचं आयुष्य बदलणारी साईबाबांची ११ वचनं वाचा | दूर होतील चिंता | शेअर करा अनुभव पहा