9 May 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

राजेश साप्ते आत्महत्या | त्या फिल्म संघटनेच्या खंडणीखोर आरोपी पदाधिकाऱ्यांचे भाजप नेत्यांशी घनिष्ट संबंध?

Rajesh Sapte Suicide case

मुंबई, ०४ जुलै | कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. शिवाय व्यवसायिक नुकसान करण्याची ही धमकी देण्यात आली होती, असं मयत राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असंही तक्रारीत म्हटलेलं आहे.

एकूण ५ आरोपींपैकी चंदन रामकृष्ण ठाकरे याने विश्वासघात करून वेळोवेळी फसवणूक केली असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. पाचही आरोपींच्या जाचाला कंटाळून राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आल्याचं सोनाली यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून, चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे, धक्कादायक गोष्ट म्हणजे “फिल्म स्टुडियोज सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियन’च्या ज्या पदाधिकारी या प्रकरणात आरोप आहेत त्यांच्यासोबत भाजपच्या अनेक नेत्यांचे घनिष्ट संबंध असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये किरीट सोमैय्या, आ. राम कदम आणि खासदार मनोज कोटक यांची नावे आहेत. संबंधित फिल्म संघटनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्याचे फोटो प्रमाणात झळकताना दिसतात. त्यामुळे या खंडणी गोळा करणाऱ्या आरोपींसोबत भाजप नेत्यांचे संबंध देखील पुढे येणं गरजेचं आहे.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pune film Art Director Rajesh Sapte Suicide case BJP leaders connections news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x