5 May 2024 9:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

नवीन घर बांधकाम ग्रामपंचायतीत कसे नोंद करावे? | असा करा अर्ज - नक्की वाचा

Grampanchayat New home construction application

मुंबई, ०५ जुलै | आपण जर गामपंचायत हद्दीमध्ये नवीन घर बांधकाम केले असेल किंवा जुने घर दुरुस्ती केला असाल तर ते घर आपल्या नावे मालक सदरी नोंद करावे लागते. आपल्यला ते घर नोंद होण्यासाठी ग्रापंचायतीला सरपंच ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो . त्यानंतर ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जाते . त्यामध्ये आपण दिलेला अर्जाचे वाचन केले जाते योग्य ती कागदपत्र पहिली जातात त्यानंतर आपला अर्ज मजूर केला जातो . त्यानंतर अपलाल्या आपल्या नावाचा ग्रामपंचात घरठाण उतारा मिळाला जातो.

त्यासाठी आपल्याला जो अर्ज लिहावा लागतो त्याचा अर्ज नमुना त्याचबरोबर अर्ज डाउनलोड उपलब्ध केला आहे तो डाउनलोड करा:

विषयः- नवीन घराची / घर दुरूस्ती / घरकुल नोंद ग्रामपंचायत दप्तरी होणेबाबत.

वरील विषयास अनुसरून आपणास, विनंती अर्ज करणेत येतो की, मी माझ्या स्वतःच्या मालकीच्या सर्व्हे नं. / गट नं. / ——- मिळकत नं.——-मध्ये नवीन घर बांधकाम / घर दुरुस्ती / घरकुल बांधकाम सन मध्ये केलेले आहे.

मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे

1) घराची दिशाः- पुर्वाभिमुखी / पश्चिमाभिमुखी / दक्षिणाभिमुखी / उत्तराभिमुखी

2) घराची लांबी ———- रुंदी ——— = ————–चौफुट

3) मिळकत वर्णन :-

1) दगड विटा मातीचे / कुडामतीचे घर

2) दगड विटा वाळु सिमेंट यांचे लोंखडी / सिमेंट पत्राचे घर / कौलारु घर

3) आर.सी.सी इमारत

4) इमारतीचा व्हरांडा / पडवी / सोपा / शौचालय

वरीलप्रमाणे सदर मिळकतीचे वर्णन असुन सदर नवीन घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करणेत यावी व घरठान उतारा मिळावा हि नम्र विनंती ,

सोबत आवश्यक कागदपत्र खालीलप्रमाणे.

घरटान उतारा / जागेचा 7/12 / खाते उतारा
खरेदी पत्र / खरेदी खत /बक्षिस पत्र
आणेवारी संमती पत्र
चतुःसिमा (100 रु स्टँप)
ग्रा.पं. सदस्य :-1) ———————————————–

2) ———————————————–

आपला विश्वासू

अर्जदाराचे नांव :- ——————————–

वरील प्रमाणे आपल्याला अर्ज लिहावा लागतो आणि त्यावर आपण अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे.

नविन घर अर्ज नमुना येथे क्लिक करून डाऊनलोड करा किंवा येथून लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करून लिंक करा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/नविन-घर-अर्ज-1.pdf

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:

हॅशटॅग्स

#GramPanchayat(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x