23 January 2021 7:04 PM
अँप डाउनलोड

नाशिकमध्ये शिवसेनेकडून लवकरच लोटसचं ऑपरेशन | दोन बडे नेते शिवबंधन बांधणार

Nashik BJP, Shivsena, MP Sanjay Raut

नाशिक, ५ जानेवारी: आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचं मोठं विधान शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये असलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. यावर शिवसेनेकडून चांगलीच टीका करण्यात आली होती. मात्र काल झाले ते प्रवेश फक्त ‘झांकी’ आहे. भारतीय जनता पक्षाचे बडे नेते अभी ‘बाकी’ आहे, अशा शब्दात सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना इनकमिंगविषयी सूचक वक्तव्य केलं होतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये शिवसेनेत मोठं इनकमिंग होणार असल्याचं विधान बडगुजर यांनी केलं होतं. येत्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाची अवस्था बिकट होणार असल्याचंही सुधाकर बडगुजर म्हणाले होते. त्यामुळे खरंच जर नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला खिंडार पडलं तर हा आगामी निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत गुरुवारी नाशिकमध्ये येत आहेत. यावेळी नाशिक भाजपमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचे हे दोन बडे नेते कोण? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये गेल्याचा वचपा काढण्यासाठीच राऊत यांचा हा दौरा असल्याचंही बोललं जात आहे.

शिवसेना नेते संजय राऊत नुकतेच नाशिकला जाऊन आले होते. त्यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता राऊत पुन्हा नाशिकमध्ये येत आहेत. राऊत यांचा हा पूर्वनियोजित दौरा नसून केवळ भाजपच्या दोन बड्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठीच राऊत नाशिकला येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, हे दोन्ही बडे नेते माजी खासदार, माजी आमदार आहेत की पालिकेतील नेते आहेत? याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाटेवर असलेले हे दोन नेते कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

News English Summary: Shiv Sena leader Sanjay Raut is coming to Nashik on Thursday on the backdrop of Nashik Municipal Corporation elections. At this time, there is a possibility of a political earthquake in Nashik BJP and two big leaders of BJP are expected to join Shiv Sena. So who are these two big leaders of BJP? This has caught everyone’s attention

News English Title: Nashik BJP leaders will join Shivsena soon in presence of MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1022)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x