17 May 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Health First | आहारात ज्वारीची भाकरी का असावी ? | हे आहेत आरोग्यदायी फायदे

Jwarichi Bhakri benefits in Marathi

मुंबई, ०९ जुलै | काॅर्न फ्लेक्स, ओट्स यांच्या वारामुळे आहारातील ज्वारीचं प्रमाण फारच कमी झालं आहे. हल्लीच्या आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे, मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक त’क्रारी कमी असतात.

याच आरोग्यदायी ज्वारीचे फा’यदे आपण आज जाणून घेणार आहोत:

भरपूर कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण:
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने श’रीरास पटकन ऊर्जा मिळते. ती उर्जा दिवसभर कामी येते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अॕमिनो अॕसिड्‌समधून श’रीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. पोळी, तंदूर रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचं आहारात पाहुण्याचं स्थान निर्माण झालंय. आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वाचा श’रीरात अभाव जाणवतो.

* सध्या ब्ल’डप्रेशर आणि हृ’दयासंबंधित आ’जारांच्या स’मस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्ल’डप्रेशर नियंत्रणात राहते.

* वाढत्या प्रदुषणामुळे आणि द’गदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मा’सिक पा’ळी आणि ग’र्भाशयाच्या स’मस्या भऱपूर प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भातील स’मस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन खुप महत्वाचं ठरते.

* ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॕसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मु’ळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.* ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. अॕनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फा’यदा होतो.

* सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आ’जारांना आ’मंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.

* ज्वारी श’रीरातील इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे म’धुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.

* ज्वारीत असणारी पोषक तत्वं कि’डनीस्टोनला आळा घालतात, त्यामुळे कि’डनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.

* ज्वारीचे सेवन र’क्तवाहिन्यांतील को’लेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Jwarichi Bhakri use in food benefits in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x