5 May 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

मुंडे समर्थक 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही पत्रं

Pankaja Munde

मुंबई, १२ जुलै | पंकजा समर्थक आणि बीडचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे तब्बल ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजेंद्र मस्के यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रं लिहून बीड जिल्ह्याची भावना त्यांच्यापुढे विशद केली आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणं कसं योग्य होतं, याकडेही मस्के यांनी पाटील यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे पाटील या कार्यकर्त्यांची कशी समजूत काढतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे केवळ बीडमधीलच नव्हे तर नगरमधील पंकजा समर्थकांनीही पदांचे राजीनामे दिले आहेत. हे लोण बीड, नगरपर्यंतच मर्यादित असलं तरी लवकरच त्याचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंकजा मुंडे सध्या दिल्लीत आहेत. कालच त्यांनी दिल्ली गाठली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाग घेतला. त्यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी भेट घेतली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Munde supporters wrote letter to State president Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x